AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघातानंतर कशी आहे विजय देवरकोंडाची प्रकृती, मोठी अपडेट समोर, म्हणाला, ‘डोकं दुखतंय पण…’

Vijay Devarakonda Accident: विजय देवरकोंडाच्या कारला अपघात, आता कशी अभिनेत्याची प्रकृती? मोठी अपडेट समोर... अभिनेता म्हणाला, 'डोकं दुखतंय पण...', चाहत्यामध्ये चिंतेचं वातावरण...

अपघातानंतर कशी आहे विजय देवरकोंडाची प्रकृती, मोठी अपडेट समोर, म्हणाला, 'डोकं दुखतंय पण...'
फाईल फोटो
| Updated on: Oct 07, 2025 | 8:18 AM
Share

Vijay Devarakonda Accident: दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आंध्रप्रदेशातील पुट्टापर्थी येथून हैदराबादला जात असताना त्याच्या कारला एक बलेनो कारने जोरदार धडक दिली. अभिनेत्याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या कारचं नुकसान झालं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघातात अभिनेत्याला दुखापत झालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर विजय याच्या ड्रायव्हरने जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. टक्कर मारणारी कार न थांबता निघून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अपघातानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया…

अपघातानंतर विजय याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करत प्रकृती उत्तम असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘सर्वकाही ठिक आहे… कारला टक्कर लागली आहे. पण आम्ही सर्व ठिक आहोत. मी स्टेंथ वर्कआउट देखील केलं आणि घरी परतलो आहे… डोकं दुखत आहे पण बिरयानी आणि झोप झाली की काहीही होणार नाही… तुम्हा सर्वांसाठी प्रेम… या बातमीमुळे त्रस्त होऊ नका… सर्वकाही ठिक आहे…’ अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे.

पोलिसांनी त्यांच्या जबाबात काय म्हटले?

घटलेल्या घटनेची माहिती देत पोलीस म्हणाले, ‘तेलुगु अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या कारची आज पुट्टापर्थीहून हैदराबादला जात असताना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवल्ली येथे दुसऱ्या वाहनाची धडक झाली. अपघातात अभिनेत्याच्या कारचं नुकसान झालं आहे. पण कोणीही जखमी झालेलं नाही…’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी झालाय साखरपुडा

रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेता रश्मिका मंदाना यांनी तीन दिवसांपूर्वी साखरपुडा केल्याची माहिती समोर येत आहे… 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या साखरपुडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली होती.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?