आता ऑपरेशन कमळ राबवणार… उद्धव ठाकरे यांची गर्जना, भाजपला धक्का देणार?

शिवसेना पक्ष पुन्हा फोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

आता ऑपरेशन कमळ राबवणार... उद्धव ठाकरे यांची गर्जना, भाजपला धक्का देणार?
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 19, 2026 | 9:03 PM

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावल्यानंतर आज शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. उद्धव ठाकरे यांनी यामेळाव्यात भाजपा आणि त्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या पद्धतीने देशाचं राजकारण सुरू आहे. ते पाहिल्यावर लोकांचं लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे.तुम्हाला नेमके किती आमदार खासदार हवेत असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की आता जे दिवस आलेले आहेत. डॉक्टर लोकं प्रश्नचिन्हांकित झालं आहे. आपण करतोय काय.एक कार्टुन आल होते. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलं. तो म्हणतो साहेब चोरी म्हणू नका. ऑपरेशन गोल्ड म्हणा.! असं चालू असेल तर आपल्याला ऑपरेशन कमळ करावे लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की हा लोकशाहीला धोका आहे. असंच सुरू राहिलं तर देश अराजकाकडे चालला आहे. मी भाकीत करत नाही. मी ज्योतिष नाही. ते दिसतंय. ज्या देशात तरुणाईला झुरळ म्हटलं जातं त्या देशाचं भविष्य काय असेल. वाटेल ते करून निवडणुका जिंकल्या जात आहे. पलिकडून कुणाला अर्ज भरूच दिला जात नाही. एवढं करून कुठे जाणार आहे. काय करणार आहात देशाचं. नड्डा म्हणाले होते देशात एकच पार्टी राहिल. यांची वाटचाल नो वन पार्टी नो इलेक्शन. भाजप दोस्त होता. प्रेमळ सल्ला देतो. या वाटेनं जाल तर दीर्घकाळ सत्ता लाभणार नाही. तरुणांना झुरळ म्हणत असाल तर मुलं पेटली तर तुमचं सरकार राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

Follow Us