आता एसटीच्या एनसीएमसी कार्डमध्ये केवळ ५ रुपयांत टॉपअप सुविधा !
एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कार्डात किमान पाच रुपयात टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता एनसीएमसी कार्डमध्ये केवळ ५ रुपयांचे टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी किमान ५० रुपयांचे टॉपअप करणे आवश्यक होते. ही अट रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक लाभार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत १.४७ कोटी कार्डांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १.३० कोटी कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी कमी भाडे लागत असल्याने तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विनामूल्य असल्याने केवळ स्वच्छता अधिभारासाठी मोठी रक्कम कार्डमध्ये ठेवावी लागू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक सुलभता मिळणार आहे. ग्रामीण भागात ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास विनामुल्य असल्याने त्यांना यात नाहक ५० रुपये टॉपअप भरावे लागत होते. त्यामुळे त्यांना भुर्दंड नको त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.