
महाराष्ट्रात बारामती येथे भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताची चौकशी सुरु आहे. अपघाताआधी विमानातील क्रू चे शेवटचे शब्द काय होते, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल एविएशनच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची माहिती दिली. Oh Sh*t…’ क्रू च्या शेवटच्या बोलण्यामध्ये हे शब्द ऐकण्यात आले, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई विमानतळावरुन उड्डाण करणारं हे विमान बारामती एअरपोर्टवर उतरणार होतं. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दोन क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट सांभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळी होत्या.
विमान रनवेच्या शॉर्ट ऑफ द थ्रेशोल्डमध्ये क्रॅश झालं. म्हणजे विमान एअरपोर्ट बाऊंड्रीच्या आत पडलं. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाने लगेच पेट घेतलं. आगीच्या ज्वाळांनी विमानाला वेढलं. बारामती एअरपोर्टची ग्राऊंड कंट्रोल सिस्टिम शहरातील दोन खासगी एविएशन अकादमी Redbird Aviation आणि Carver Aviation चे पायलट कॅडेट्स संभाळतात. DGCA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमानाने नियंत्रण गमावलं. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार लँडिंगचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी दादांना अखेरच निरोप देण्यासाठी विराट जनसमुदाय तिथे उपस्थित होता. अजित पवार यांची अकाली एक्झिट सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली.
चार ते पाच स्फोट झाले
प्रत्यक्षदर्शींनुसार विमान जमिनीवर धडकताच आगीच्या ज्वाळांनी घेरलं. एकापाठोपाठ एक चार ते पाच स्फोट झाले. जवळपासच्या भागात या स्फोटाचे आवाज ऐकू आले. लोक घाबरलेले. घटनास्थळाजवळ असलेले शेतकरी आणि स्थानिक लोकांनुसार विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं. अपघाताची दृश्य खूप भयावह होती.
DGCA काय तपासणार?
DGCA अधिकाऱ्यांनुसार विमान धावपट्टीपासून खूप कमी अंतरावर जाऊन कोसळलं. विमान कंट्रोलच्या बाहेर का गेलं? हे सांगणं कठीण आहे. लँडिंगच्यावेळी हवामान, रनवेची स्थिती आणि पायलटचा निर्णय काय होता याचा DGCA कडून तपास सुरु आहे.