AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसाकडून पत्ते ओपन, महत्त्वाची माहिती समोर

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसाकडून पत्ते ओपन, महत्त्वाची माहिती समोर
ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 5:31 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं. शिवेसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार शिल्लक आहेत. तर महायुतीमध्ये राज्यात शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार आहेत, शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. दरम्यान हा धक्का ताजा असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान असं झाल्यास हा शिवसेना ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा झटका असणार आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन टायगरची बातमी फेटाळून लावण्यात आली आहे, वातावरण दूषित करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.  यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी मोठा खुलासा केला आहे. भरत गोगवले हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती मानले जातात.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

भरत गोगावले यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केलं आहे. ऑपरेशन टायगर सांगून होत नाही, ते एकनाथ शिंदे डायरेक्ट करतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहा, आमच्याकडे यायला अनेकजण तयार आहेत, असं यावेळी भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावर देखील यावेळी गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम , आम्हालाच न्याय मिळेल आमचीच खरी शिवसेना, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला