AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Beaten : वसईत कौटुंबिक वादातून उच्चभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

वसईतील गोखीवरे परिसरात परेरा कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबात काही कारणाने कौटुंबिक वाद आहेत. या वादाचे आज हाणामारीत पर्यावसन झाल्याचे पहायला मिळाले. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यात एका महिलेला पुरुष केस धरुन मारत असल्याचे दिसत आहे.

Vasai Beaten : वसईत कौटुंबिक वादातून उच्चभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद
वसईत कौटुंबिक वादातून उचभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 12:52 AM
Share

वसई : कौटुंबिक वादातून वसईतील एका उच्चभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वसईत घडली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्हीत(CCTV) कैद झाली आहे. वसईतील गोखीवरे परिसरात राहणाऱ्या परेरा कुटुंबात(Parera Family) आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. मारामारी करणारे सर्व जण एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आणि त्यांचे कुटुंबिय आहेत. या प्रकरणात कौटुंबिक वाद(Family Disputes) असल्या कारणाने पोलीस मध्यस्थी करून वाद मिटवितात की एकमेकांवर गुन्हे दाखल करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (A high profile family fight over a family dispute in Vasai)

हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद

वसईतील गोखीवरे परिसरात परेरा कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबात काही कारणाने कौटुंबिक वाद आहेत. या वादाचे आज हाणामारीत पर्यावसन झाल्याचे पहायला मिळाले. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यात एका महिलेला पुरुष केस धरुन मारत असल्याचे दिसत आहे. सख्या भावांचा कौटुंबिक वाद हा किती विकोपाला जाऊ शकतो आणि सखे भाऊ कसे पक्के वैरी होतात हेच या सीसीटीव्हीमधील घटनेवरून समोर आले आहे.

पुण्यातील धानोरीतही हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये पुन्हा एकदा गावगुंडांनी हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. गेल्या आठवड्यातच गाव गुंडांनी दहशत केल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी कोणतीच तक्रार घेतली नव्हती. यानंतर पुन्हा एकदा बुधवारी रात्री दहशत माजविल्याने व्यापारी तसेच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या गुंडांना त्वरीत अटक न केल्यास दुकाने बंद करुन आंदोलन करण्याचा इशारा येथील व्यापारी संघटनेने दिला आहे. या गल्लीतील गुंडावर कारवाई करण्याची मागणी धानोरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ टिंगरे यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे. धुडगूस घालणाऱ्या दोन जणांना रात्री उशिरा विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (A high profile family fight over a family dispute in Vasai)

इतर बातम्या

Wardha : आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयासह कदम हॉस्पिटलमध्ये पाहणी

Palghar : पालघरमध्ये वन विभागाच्या परिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.