Pune Crime : शिरुरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : शिरुरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.

रणजीत जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 21, 2022 | 9:32 PM

पुणे : विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर आठ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर तालुक्यता घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींनी अटक केली आहे. तर अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज व नवनाथ वाळुंज अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. (A case has been registered against eight persons for gang-raping a woman in Shirur, Pune)

महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला धमकावून बलात्कार करायचे

पीडित महिला विधवा असून घरी एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या नराधमांनी गैरफायदा घेतला. सर्व नराधम आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. महिला साधी असल्याने हे नराधम तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. महिला घाबरुन त्यांच्या सोबत जात होती. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.

पाच आरोपींना अटक केली असून तिघांचा शोध सुरु

अखेर महिलेला हा त्रास असह्य झाल्याने तिने हिंमत करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत या आठ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यापैकी पाच आरोपींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या असून तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पलायन करणाऱ्या तिघांचाही पोलीस शोध घेत आहेत. (A case has been registered against eight persons for gang-raping a woman in Shirur, Pune)

इतर बातम्या

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Clubhouse app chat case:क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणात तीन जण ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें