Clubhouse app chat case:क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणात तीन जण ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर

Clubhouse app chat case:क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणात तीन जण ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर
cyber crime

क्लबहाऊस अॅपवरील चॅट्सच्या (Clubhouse app chat) संदर्भात मुंबई पोलिसांनी 19 ते 22 वयोगटातील तीन तरुणांना हरियाणातून अटक केली आहे, ज्यामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद चॅट केले गेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 21, 2022 | 7:17 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच सुल्ली डिल (Sulli deal) प्रकरणाने खळबळ माजवली असताना आता क्लबहाऊस अॅपवरील चॅट्सच्या (Clubhouse app chat) संदर्भात मुंबई पोलिसांनी 19 ते 22 वयोगटातील तीन तरुणांना हरियाणातून अटक केली आहे, ज्यामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद चॅट केले गेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी (Mumbai cyber Police) गुरुवारी रात्री उशिरा अटकेची कारवाई केली आहे. जयष्णव कक्कर (21) आणि यश पराशर (22) या दोन आरोपींना फरीदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले, तर तिसरा एक, आकाश सुयाल (19) याला कर्नाल येथून अटक करण्यात आली, त्यांना मुंबईत आणले जात आहे.

तिन्ही आरोपी उच्चशिक्षित

आरोपी यश पराशर हा लॉचा विद्यार्थी आहेत, तर कक्करने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. सुयालचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 19 जानेवारी 2022 रोजी एका महिलेने सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता. तिच्या तक्रारीत, महिलेने क्लबहाऊस चॅटमध्ये सहभागी महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबर रोजी चॅट रूममध्ये महिलांबद्दलच्या चॅटमध्ये तिचे फोटो तसेच तिच्या बालपणीच्या मैत्रिणीचे फोटो वापरण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तपासादरम्यान, पोलिसांना 16 आणि 19 जानेवारीला क्लबहाऊस अॅपवर दोन चॅट रूम तयार करण्यात आल्याचे आढळले, यात महिलांबाबत आक्षेपार्ह बोलले होते. ते महिलांच्या शरीराच्या अवयवांचा लिलाव करण्याबद्दलही बोलले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या दोन चॅट रूममध्ये सुमारे 300 सहभागी असले तरी, ज्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली तेच या प्रकरणात आरोपी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘जैमीन’ या ट्विटर वापरकर्त्याने क्लबहाऊस चॅट्सचा व्हिडिओ अपलोड केला होता, जो ‘लोटस वॉच’ नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आला होता. ज्यात महिलांविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरण्यात आली होती. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Malad Murder : पत्नीची हत्या करुन पतीची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल

Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचा उलगडा; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें