Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार
बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील नर्सने सफाई कर्मचारी असलेल्या 16 वर्षीय मुलीला मुलाल इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे या मुलीने मुलाला दोन इंजेक्शन दिले. एक सलाईनमधून दिले. तर दुसरे थेट टोचले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.

आनंद पांडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 21, 2022 | 8:38 PM

मुंबई : रुग्णालयात सफाई कर्मचारी असलेल्या अल्पवयीन मुलीने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, रुग्णालयातील नर्स आणि सदर अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, नसिमुद्दीन सय्यद, सलीम उंनीसा खान अशी आरोपींची नावे आहेत. (Death of a two-year-old boy due to incorrect injection given by a minor cleaner)

चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबियांच्या दोन वर्षाच्या मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे खान परिवाराने त्याला शिवाजीनगरमधील नूर रुग्णालयात 11 जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी मुलाला डिस्चार्जही देण्यात आला होता. डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील नर्सने सफाई कर्मचारी असलेल्या 16 वर्षीय मुलीला मुलाल इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे या मुलीने मुलाला दोन इंजेक्शन दिले. एक सलाईनमधून दिले. तर दुसरे थेट टोचले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार

मुलाच्या नातेवाईकांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातून रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. मुलाच्या मृत्यू प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, रुग्णालयाचे व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, नर्स सलीम उंनीसा खान आणि अल्पवयीन सफाई कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले. मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी मुलाच्या नातेवाईकांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस पुढील तपास करीत असून फरार आरोपींचाही शोध घेत आहेत. (Death of a two-year-old boy due to incorrect injection given by a minor cleaner)

इतर बातम्या

Malad Murder : पत्नीची हत्या करुन पतीची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें