AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

नेवासा येथे वीज तोडणीविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होते. मात्र मागणी मान्य होत नसल्यामुले मुरकुटे यांनी हे पाऊल उचलले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Video | भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न
BALASAHEB MURKUTE
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 9:26 PM
Share

अहमदगर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. नेवासा येथे वीज तोडणीविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होते. मात्र मागणी मान्य होत नसल्यामुळे मुरकुटे यांनी हे पाऊल उचलले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अहमदनगरात कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली असून नेवासा येथे वीज वितरण कार्यालयाच्या परिसरात  आंदोलन सुरु आहे. कृषीपंपांची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या आंदोलनात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र आंदोलन करुनदेखील मागण्या मान्य होत नसल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ :

उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातच हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना इतर लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या मुरकुटे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, वीजतोडणी करु नये या मागणीसाठी एका माजी आमदाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यामुळे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

इतर बातम्या :

‘मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता’, जयंत पाटलांचा खोचक टोला

सुधींद्र कुलकर्णी, जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जींशी भेट, काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट…’ शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.