सुधींद्र कुलकर्णी, जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जींशी भेट, काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

राजकारणी-लेखक सुधींद्र कुलकर्णी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आज पश्चिम ममता बॅनर्जी यांची दिल्ली भेट घेतली. तर, काँग्रेस नेते आणि माजी खासदार कीर्ती आझाद यांनी आज टीएमसीमध्ये प्रवेश केला.

सुधींद्र कुलकर्णी, जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जींशी भेट, काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांचा टीएमसीमध्ये प्रवेश
Javed Akhtar


नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बनर्जी तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि त्याआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक राजकारण्यांशी त्यांच्या भेटी होता आहेत, तर इतर पक्षांतील नेत्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

राजकारणी-लेखक सुधींद्र कुलकर्णी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आज पश्चिम ममता बॅनर्जी यांची दिल्ली भेट घेतली. तर, काँग्रेस नेते आणि माजी खासदार कीर्ती आझाद यांनी आज टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनीही टीएमसीमध्ये प्रवेश केला. कीर्ती आझाद काँग्रेसपूर्वी भाजपमध्ये होते आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते संसदेत पोहोचले. मात्र पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. नंतर, 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो यांनीही काल टीएमसीमध्ये प्रवेश केला. जेडीयूचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार पवन वर्मा यांनीही टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. यादरम्यान पवन वर्मा म्हणाले की, बंगालमध्ये ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता मी टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. पवन वर्मा हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सल्लागार होते, 2020 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

टीएमसीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाल्ली आहे. अलीकडे, टेनिस स्टार लिएंडर पीसनेही पार्टीत प्रवेश केला होता. तो गोव्यात टीएमसीचा मुख्य चेहरा असेल, असं मानलं जातं आहे.

या दौऱ्यात ममता पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्याता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही त्या भेट घेणार आहेत. दिल्लीत ममता भाजप खासदार वरुण गांधी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. वरुण गांधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार आहेत अशी चर्चा आहे. अलीकडेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढले गेले होते. या दौऱ्यात त्या सपा, बसपा या पक्षांच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता

आता मनीष तिवारींच्या पुस्तकावरून वाद, 26/11 नंतर PAK वर कारवाई न करणे मनमोहन सरकारची कमजोरी होती, भाजपने मागितले उत्तर

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI