AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळ्याची दाट शक्याता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीसह आणखी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता
PM Narendra Modi
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 23, 2021 | 6:01 PM
Share

नवी दिल्लीः बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळ्याची दाट शक्याता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीसह आणखी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

सरकारने कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी जाहीर केले. मात्र, किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीबाबत शेतकरी अजूनही ठाम आहेत आणि आंदोलन मागे घेतलेलं नाही. जोपर्यंत कायदे राज्यासभेत मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच राहील, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत पण ठाम आहेत की, ‘पंतप्रधान देशासमोर माफी मागू शकतात, पण देशासमोर माफी मागून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. एमएसपीची हमी देण्यासाठी कायदा झालाच पाहीजे. तोपर्यंत शेतकरी आंदेलन सुरूच राहील.’ तर, संयुक्त किसान मोर्चा (SKM) जे गेल्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे मागे घेण्याबाबत आणि इतर मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावे, एमएसपी कायदा बनवणे आणि लखीमपूर हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशा काही त्यांच्या मागण्या आहेत.

एका वर्षाच्या आंदोलनानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले आहे आणि अखेर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते.

क्रिप्टोकरन्सीवर नवे विधेयक

यापूर्वी, सरकारने क्रिप्टोकरन्सीसंदर्भात अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर आता सरकार यावर नवे विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. उद्याच्या बैठकीत मंत्रिमंडळाची याला मान्यता मिळू शकते. भारतात सध्या क्रिप्टोकरन्सीबाबत कोणताही कायदा नाही. मात्र, ते बेकायदेशीर देखील नाहीये. अशा परिस्थितीत सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत कोणते विधेयक मांडते हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे देशातील क्रिप्टोकरन्सी व्यवहारांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होईल. असे मानले जाते की, सरकार क्रिप्टोकरन्सी बंदी घालणार नाही, पण कठोर नियम लागू केले जातील.

इतर बातम्या

Farm Laws: सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारी अधिकारी तज्ज्ञ झाले आहेत- शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

Special Story ! खरीप साधलं नाही अन् रब्बीचा अवमेळ, शेतकऱ्यांची महिन्याची कमाई 3798 रुपये, सांगा शेती करायची कशी?

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...