AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असं विधान केले आहे.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
Bhaskar Jadhav on Ajit Pawar Plane CrashImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 4:14 PM
Share

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्त दादांना वेगवेगळ्या स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अनेकांनी अजित दादांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. सध्या या अपघाताचा तपास यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असं विधान केले आहे. जाधव यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

भास्कर जाधव यांचे खळबळजनक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताबाबत आमदार भास्करराव जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या अपघात हा साधा अपघात नसून तो घातपात होता, असा दावा त्यांनी केला आहे. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी भास्करराव जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही भरभरून कौतुक केले. ‘अजितदादा म्हणजे कठोर शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्मळ मनाचा राजा माणूस आहेत. प्रशासन आणि राजकारणात त्यांनी वेगळी कार्यशैली निर्माण केली असून, अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत,’असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

नीट पेपरफुटीवरही भाष्य

भास्कर जाधव यांचे व्हाट्सअप स्टेटस देखील चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी स्टेट्समध्ये म्हटले की, ‘सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणं सोपं आहे; पण स्वतःच्या कृतीकडे पाहणं कठीण होईल काही जणांना. पेपर लीक करणारे दोषी आहेतच पण तोच पेपर विकत घेणारे निर्दोष कसे? जोपर्यत “मला फक्त यश हवं, ते कसंही मिळालं तरी चालेल ” ही मानसिकता जिवंत आहे, तोपर्यत पेपर लीक थांबणारच नाहीये. मंत्री बदलतील, अधिकारी बदलतील, व्यवस्था बदलेल… पण नैतिकता बदलली नाही तर ?? भ्रष्टाचार नव्या चेहन्यांने पुन्हा उभा राहील. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.

देश बदलायचा असेल तर…

नैतिकतेशिवाय कोणतीही क्रांती अपूर्ण असते. पोस्टर, स्टेटस आणि हॅशटॅगने समाज बदलत नाही; समाज बदलतो तो प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारलेल्या एका प्रश्नाने “मी स्वतः प्रामाणिक आहे का?” पेपर लीक करणान्यांइतकाच तो विकत घेणान्यचाही गुन्हा आहे. कारण भ्रष्ट व्यवस्थेला बळ देणारे हात फक्त विकणाऱ्यांचे नसतात, तर विकत घेणाऱ्यांचेही असतात. देश बदलायचा असेल तर आधी स्वतःची नैतिकता बदला. अन्यथा आंदोलनांना पाठिंबा देणं ही फक्त दिखाऊ देशभक्ती ठरेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...