बच्चू कडूंच्या स्टिंग ऑपरेशननंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, सखोल चौकशीचे आदेश

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे समोर आले होते. (Food and Drug Administration officials inquiry after Bacchu Kadu sting operation in akola)

बच्चू कडूंच्या स्टिंग ऑपरेशननंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, सखोल चौकशीचे आदेश
बच्चू कडू यांच्याकडून गुटखा विक्रीचं स्टिंग ऑपरेशन
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:23 AM

अकोला : शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान अकोला जिल्ह्यातील अनेक पानपट्ट्यांवर प्रतिबंधित गुटखा मिळत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाईही केली जाणार आहे. त्यामुळे आता अन्न आणि औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे. (Food and Drug Administration officials inquiry after Bacchu Kadu sting operation in akola)

बच्चू कडू यांच्याकडून वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी वेशांतर करुन अकोला आणि पातूर शहरात शासकीय कार्यालये, स्वस्त धान्य दुकाने आणि काही दुकानांची तपासणी केली. यावेळी बच्चू कडू यांनी अवैधरित्या गुटखाविक्रीचं एक स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये लाचखोरीचं एक धक्कादायक वास्तव उजेडात आलं आहे. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन तपासणी करत असताना एका दुकानदाराला प्रश्न विचारला की, हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का? त्यावर दुकानदाराने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. दुकानदाराने दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील लाचखोरीचं वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडू यांचा स्टिंग ऑपरेशनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे समोर आले होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप बच्चू कडू यांनी केला होता.

अन्न आणि औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

दरम्यान या संदर्भात अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. जर या चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यामुळे आता अन्न आणि औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे.

पातूरमधील सरकारी कार्यालयांमध्येही धडक

अकोला शहरातील शासकीय कार्यालयांना भेट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या मोर्चा पातूर शहराकडे वळवला. तिथल्या शासकीय कार्यालयामध्ये भेटी दिल्यानंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन गुटख्याची विक्री होते का? याचीही पाहणी त्यांनी केलीय. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन टाकलेल्या एकप्रकारच्या धाडीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या वेशांतराचीच चर्चा सुरु आहे.

(Food and Drug Administration officials inquiry after Bacchu Kadu sting operation in akola)

संबंधित बातम्या : 

Video : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात! 

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.