गजराज जमूनठमून आला; गणपती बाप्पा मोरयाचा गजर करताच निघून गेला

एक हत्ती आला. तो समोर येत होता. एवढ्यात गस्तीवरील पथकं तिथं पोहचलं. एक जण मोबाईलमध्ये हत्तीचे चित्रीकरण करत आहे. हत्तीला हाकलण्यासाठी विनंती केल्याशिवाय पर्याय नाही, असं गस्तीवरील पथकाच्या लक्षात आले.

गजराज जमूनठमून आला; गणपती बाप्पा मोरयाचा गजर करताच निघून गेला
| Edited By: | Updated on: Mar 02, 2023 | 1:09 PM

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या विनवणीनंतर एक जंगली हत्ती माघारी फिरला. ही घटना दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात घडली आहे. जंगलात गस्ती पथकाच्या काही मीटर अंतरावर हत्ती समोर आला. जा रे जा… सावकाश जा… बरा कर रे बाबा… गणपती बाप्पा मोरया… अशी हत्तीला विनवणी करण्यात आली. गस्ती पथकातील शेतकरी ग्रामस्थांनी ही विनवणी केली. अन् आश्चर्य म्हणजे तो हत्ती चक्क माघारी फिरला. सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला. हत्तींचा कडप आला की, नुकसान हे ठरलेलं. हत्तीचा कडप कोणाला जुमानत नाही. मग, हा कडप जिथ जाईल तिथं नुसकान करतो, असा समज आहे. जंगलाशेजारील गावांना हत्तीच्या कडपाचा त्रास हा असतोच. पण, याठिकाणी काहीस वेगळं घडलं.

व्हिडीओत काय दिसतं?

एक हत्ती आला. तो समोर येत होता. एवढ्यात गस्तीवरील पथकं तिथं पोहचलं. एक जण मोबाईलमध्ये हत्तीचे चित्रीकरण करत आहे. हत्तीला हाकलण्यासाठी विनंती केल्याशिवाय पर्याय नाही, असं गस्तीवरील पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे ते चल, चल, गणपती बाप्पा मोरया. तू जा बाबा जा, अशी विनवणी हत्तीला करत आहेत. असं म्हणताचं हत्ती माघारी फिरला. त्यामुळं ही विनवणी त्याला समजली म्हणून तो माघारी फिरला की, आणखी काही हे कळायला मार्ग नाही. पण, हत्तीनं माघार घेतली, याचे समाधान या पथकाला आला. कारण या भागातील नुकसान टळलं. शिवाय आमचं हत्ती ऐकतो, असाही समज या पथकाला झाला.

चर्चा या व्हिडीओची

हत्तीला परत जा रे बाबा म्हटल्याने तो परत गेला. या व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची चर्चा सुरू झाली आहे. खरचं हा गजराज म्हणजे बाप्पाचा अवतार असेल का. त्याला सांगितलेलं समजलं असेल का, अशा चर्चा सुरू झाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहे. यात किती तत्थ्य आहे, हे काही सांगता येणार नाही.