Chandrapur monkey | चंद्रपुरात माकडाच्या पिल्लाच्या तोंडात लोटा, लोटा काढण्यासाठी वनविभागाची सहा तास झुंज; आधी आक्रमक झालेली वानरसेना खुश

| Updated on: Jun 05, 2022 | 3:56 PM

माकडाच्या पिल्लाला तहान लागली. तो पाणी पिण्यासाठी भटकत होता. एका लोट्यात त्याला पाणी दिसले. ते पाणी पिण्यासाठी त्यानं लोट्यात तोंड टाकलं. ते काही निघेना. वानरसेना एकत्र आली. त्यांनी पिलाच्या तोंडातून लोटा काढण्याचा बराच प्रयत्न केला.

Chandrapur monkey | चंद्रपुरात माकडाच्या पिल्लाच्या तोंडात लोटा, लोटा काढण्यासाठी वनविभागाची सहा तास झुंज; आधी आक्रमक झालेली वानरसेना खुश
चंद्रपुरात माकडाच्या पिल्लाच्या तोंडात लोटा
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरच्या राजुरा शहरातील (City Rajura) सोमनाथपुर वॉर्ड भागात विचित्र संकट कोसळलं. अडकलेल्या एका माकडाच्या पिलाच्या सुटकेसाठी वनविभागाच्या 3 विशेष पथकांनी प्रयत्नांची शर्थ केली. सोमेश्वर मंदिराजवळ एका माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात (गडवा) अडकले. या पिलाच्या सुटकेसाठी माकडाचा टोळीने जिवाचा आकांत चालविला होता. वानरसेनेने या भागात या घटनेनंतर धुमाकूळ घातला होता. वनविभागाला याची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी पोचले. माकडाच्या पिलाला ताब्यात घेण्याकरिता पिंजरा (cage), जाळी, तसेच खाद्य वापरण्यात आले. पण, माकडाची टोळी दाद देईनाशी झाली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बचाव पथक तसेच कोठारी येथील बचाव पथकाला (rescue squad) पाचारण करून योजना आखण्यात आली.

लोटा कापून काढला

तब्बल साडेसहा तासाच्या अथक परिश्रमानंतर पिलाला ताब्यात घेतले गेले. पिलाच्या चेहऱ्यावर अडकलेला लोटा कापून काढण्यात आला. माकडाच्या पिल्ल्याची प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार करून सुदृढ असल्याची खात्री केली. त्याच्या आईसोबत निसर्गमुक्त करण्यात आले. वन विभागाच्या या कामगिरीचे जिल्हाभरातून अभिनंदन होत असल्याचं राजुरा वनपरिक्षेत्राचे अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी सांगितलं. यावेळी या माकडाच्या पिलाला पकडताना लोकांची गर्दी जमली होती. वनविभागापुंढ फार मोठं आव्हान होते. ते त्यांनी सहज पेललं.

नेमकं काय घडलं

माकडाच्या पिल्लाला तहान लागली. तो पाणी पिण्यासाठी भटकत होता. एका लोट्यात त्याला पाणी दिसले. ते पाणी पिण्यासाठी त्यानं लोट्यात तोंड टाकलं. ते काही निघेना. वानरसेना एकत्र आली. त्यांनी पिलाच्या तोंडातून लोटा काढण्याचा बराच प्रयत्न केला. पण, लोटा काही निघेना. त्यामुळं वानरसेनेनं धुमाकुळ घातला. ही बाब वनविभागापर्यंत पोहचली. त्यांनी पिलाला सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, वानरसेना अडचण ठरत होती. तब्बल सहा तास वनविभागाची तीन पथकं या कामात लागले होते. जाळीत पिलाला अडकविण्यात आलं. शेवटी पिलाच्या तोंडातील लोटा कापण्यात आला. त्यानंतर पिलाची लोट्यातून सुटका झाली. पिलाला वानरसेनेत सहभागी करून देण्यात आले. असा हा थरार तब्बल सहा तास चालला.

हे सुद्धा वाचा