साखर उद्योग आयकर विभागाच्या रडारवर?, पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटींची नोटीस

| Updated on: Oct 01, 2021 | 12:40 PM

राज्यातील 60 सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागानं साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्यानंतर साखर उद्योगात खळबळ उडाली आहे.

साखर उद्योग आयकर विभागाच्या रडारवर?, पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटींची नोटीस
साखर कारखाना
Follow us on

हिंगोली: राज्यातील 60 सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागानं साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्यानंतर साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. हिंगोली पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटी रुपये भरण्याची नोटीस आयकर विभागानं पाठवली आहे. विविध कारणांमुळं संकटात असलेल्या साखर उद्योगापुढं नव संकट या निमित्तानं उभ राहिल्याचं चित्र आहे.

नोटीस का आली?

ऊस खरेदी किंमत कारखान्याचा नफा असे करसूत्र लावून आयकर विभागाने 1992 पासूनच्या उत्पादनावर कोट्यवधी रुपयांचा आयकर थकला असल्याचे सांगत राज्यातील 60 हून अधिक कारखान्यांना नोटिसा दिल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटी भरावे अशी नोटीस आली आहे.

पुढील वर्षी 60 कारखाने बंद राहण्याची भीती

राज्यातील 60 सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर साखर महासंघाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर या संदर्भात मत व्यक्त केलं आहे. आयकर विभागाकडून अशी वसुली झाली तर पुढील हंगामात 60 कारखाने सुरूच होणार नाहीत व कारखानदारी अधिक अडचणीत येईल. त्यामुळे हा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोडविला पाहिजे, अशी मागणी डॉ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली आहे.

15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु

राज्यात 2021-22 साठी उसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. जे कारखाने 15 ऑक्टोबर 2021 पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत असा निर्णय ही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला होता.

एफआरपी नेमकी किती?

गाळप हंगाम 2021-22 साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर असून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे अशी माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. या हंगामात  अंदाजे 193 साखर  कारखाने सुरु राहतील.

इतर बातम्या:

मेटाकुटीला आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांची ताकद, बोली जिंकली, महाराजा पुन्हा उत्तुंग भरारी घेणार?

रत्नागिरीत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा शंभरी पार, आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं

Income Tax Department sent notice to sixty sugar mills including Purna Cooperative Sugar Mill of Hingoli