रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झडती, दोन फौजदारांसह तीन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीरपणे झडती घेणं तीन पोलिसांना भोवलं आहे.

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झडती, दोन फौजदारांसह तीन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन
MAHARASHTRA POLICE
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 10:55 PM

जालना: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीरपणे झडती घेणं दोन फौजदार आणि तीन पोलिसांना भोवलं आहे. जाफराबाद ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज तडकाफडकी निलंबित केले आहे. (Jalna SP Vinayak Deshmukh suspend three police for investigation at public relation office of Raosahaeb Danve)

तीन पोलिसांचं निलंबन

पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल सह उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल अशा  पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तिडके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी यांचं निलंबन करण्यात आलं आहे

नेमकं प्रकरण काय?

पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके यांनी 11 जून 2021 रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नसताना आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नसताना एका राजकीय पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय येथे प्रवेश करुन कायदेशीर अधिकार नसताना कार्यालयाची झाडाझडती घेऊन शोध घेतला. अशाप्रकारे पोलीस खात्याची जनमानसात प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. कायद्याचेव परिपूर्ण ज्ञान असताना देखील कर्तव्यात बेकायदेशीर व अत्यंत बेशिस्तपणाचे वर्तन केले आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली

‘दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’, शिवसेनेचा टोला

(Jalna SP Vinayak Deshmukh suspend three police for investigation at public relation office of Raosahaeb Danve)

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.