गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली

तुला गिफ्ट द्यायचं आहे असं सांगून घरी बोलावलेल्या आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे.

गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली
Navi Mumbai bullet fired

नवी मुंबई : तुला गिफ्ट द्यायचं आहे असं सांगून घरी बोलावलेल्या आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे. तर गोळीबारामध्ये जखमी झालेल्या मुलाचे नाव विजय पाटील असे आहे. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या विजयवर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भगवान पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Navi Mumbai retired police officer Bhagwan Patil fired Three bullets towards his own son Vijay Patil seriously injured)

मुलांवर गोळीबार, पत्नीला मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील एरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत. विजय पाटील हा त्यांचा मुलगा असून तो सध्या वसईला राहतो. त्याला भगवान पाटील यांनी तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय पाटील तसेच दुसरा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.

गोळ्या का झाडल्या याचे कारण अद्याप अस्पष्ट

भगवान पाटील या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाला घरी बोलावल्यानंतर त्याच्यावर अचानकपणे रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये विजय पाटील या तरुणाला तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती सध्या चिंतानजक असून दुसऱ्या मुलाच्याही अंगाला गोळी लागून गेली आहे. भगवान पटील याने आपल्याच मुलावर गोळीबार का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी त्याला तब्यात घेतले आहे. पोलीस भगवान पाटील यांची चौकशी करत असून लवकरच नेमके कारण समजेल.

आधीही भगवान पाटील यांच्याकडून असेच कृत्य

भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या :

आधी खून नंतर जाळलं, युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात खळबळ

बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या

(Navi Mumbai retired police officer Bhagwan Patil fired Three bullets towards his own son Vijay Patil seriously injured)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI