ना ओटी, ना सोडीचोळी, ना प्रसाद; भक्तांना फक्त अंबाबाईचं दर्शन घेता येणार, वाचा नियमावली!
अंबाबाई मंदिरात ओटी, प्रसाद आणि देवीला साडी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर सुरू होत आहे. त्यामुळे भक्तांना फक्त देवीचे दर्शन घेता येणार आहे.
अंबाबाई मंदिरात ओटी, प्रसाद आणि देवीला साडी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर सुरू होत आहे.
Follow us
अंबाबाई मंदिरात ओटी, प्रसाद आणि देवीला साडी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर सुरू होत आहे.
त्यामुळे भक्तांना फक्त देवीचे दर्शन घेता येणार आहे. पूर्व दरवाज्यातून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडलं जाणार आहे. त्यानंतर देवीचे दर्शन झाल्यानंतर भक्तांना दक्षिण दरवाज्यातून बाहेर पाठविले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला देवीचे मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यत खुलं ठेवलं जाणार आहे.
या दरम्यान भक्तांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी सॅनिटाझर, थर्मल स्कॅनिंग केलं जाणार आहे. लवकरच याबाबत लेखी आदेश काढला जाईल, असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलंय.