नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी लसीकरण, लसवंतांची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बोलीभाषेतून जनजागृती ते लसवंत कॅम्प’

राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यात नंदुरबार पहिल्या स्थानी असून जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी लसीकरण, लसवंतांची टक्केवारी वाढविण्यासाठी 'बोलीभाषेतून जनजागृती ते लसवंत कॅम्प'
के सी पाडवी, पालकमंत्री नंदूरबार

नंदूरबार : राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यात नंदुरबार पहिल्या स्थानी असून जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

लसवंतांची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बोलीभाषेतून जनजागृती ते लसवंत कॅम्प’

जिल्ह्यातील येणाऱ्या यात्रा आठवडे बाजार तसेच विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत. त्यासोबत दुर्गम भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्थानिक बोलीभाषेतून जनजागृती करण्यात येणार आहे.

तर काही ठिकाणी लसीकरणासाठी पोलिस प्रशासनाचे ही मदत घेतली जाणार आहे. अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि स्थानिक राजकीय पदाधिकारी यांच्या मदतीने दुर्गम आणि आदिवासी भागात जनजागृतीचे कार्य केले जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी दिले आहे.

लसीकरणाच्या या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीकरणाला प्राधान्य द्या आणि जिल्हा कोरोना मुक्त ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लसीकरणाविषयी कोणतेही समज गैरसमज, अंद्धश्रद्धा ठेऊ नका. जर लस घेतली तरच कोरोनाला आपण हद्दपार करु शकतो, असं आवाहन करत नागरिकांना लसवंत होण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात

ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल अशा गावातील सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 64% लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100% लसीकरण झालेले आहे अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण कॅम्प घेण्यात येणार आहे.

लसीकरण शिबिरात ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला.

हे ही वाचा :

Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश

‘मला लस नको, भीती वाटतीय’, नाक मुरडणाऱ्या आजीबाई लसीकरणासाठी तयार कशा झाल्या, Video पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI