जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारा पूर्ण, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सदाभाऊ खोत यांचं पाण्यात उतरुन जलपूजन

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. (Sadabhau khot wishes to Devendra Fadnavis on his birthday)

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारा पूर्ण, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सदाभाऊ खोत यांचं पाण्यात उतरुन जलपूजन
BJP party workers

सांगली : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मरळनाथपूर ता. वाळवा येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या बंधाऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जलपूजन करत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रयक क्रांती संघटनेचे शेकडो कार्यकर्ते पाण्यात उतरले होते. (Sadabhau khot wishes to Devendra Fadnavis on his birthday)

फडणवीसांना शुभेच्छा देताना सदाभाऊ खोत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मातीचे तसेच सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले. पावसाळ्यात निसर्गराज्याच्या कृपेने अनेक ठिकाणचे बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यांमुळे त्या-त्या भागातला शेतकरी सुखावला आहे. महाविकास आघाडी सरकार कोणतेही विकासात्मक काम न करता जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करत आहे.

फडणवीस जलनायक

सदाभाऊ खोत म्हणाले की, या भरलेल्या बंधाऱ्यात उडया मारा आणि पोहायला लागा मग तुम्हाला समजेल देवेंद्र फडणवीस यांनी काय काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खरे जलनायक आहेत. या जलनायकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही पाणीपूजन करत आहोत. देवेंद्रजी फडणवीस यांनी पाणी अडवलं, पाणी मुरवलं आणि मुरवलेलं पाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिलं. तसेच शेतकऱ्यांची शेती हिरवीगार केली. यावेळी युवा नेते सागर खोत, लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, जयकर कचरे, अतुल पाटील, विनायक जाधव, दत्तात्रय खोत, रवींद्र एगुरे, धनाजी मोरे, राजाभाऊ खोत, कय्युम शेख, सर्फराज डाके आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (Sadabhau khot wishes to Devendra Fadnavis on his birthday)

इतर बातम्या

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका

राज्यात नवीन समीकरण घडत असताना पाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी; ठाकरे सरकारने मागवला अहवाल

“लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या,” प्रविण दरेकरांची मागणी

(Sadabhau khot wishes to Devendra Fadnavis on his birthday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI