राज्यात नवीन समीकरण घडत असताना पाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी; ठाकरे सरकारने मागवला अहवाल

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी इस्रायलला गेले होते. हे पाचही अधिकारी सोशल मीडियाचं प्रशिक्षण घ्यायला गेले होते. (isreali spying software)

राज्यात नवीन समीकरण घडत असताना पाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी; ठाकरे सरकारने मागवला अहवाल
mantralaya
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:07 AM

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी इस्रायलला गेले होते. हे पाचही अधिकारी सोशल मीडियाचं प्रशिक्षण घ्यायला गेले होते. विशेष म्हणजे कुणाचीही परवानगी न घेता हे अधिकारी इस्रायलाल गेले असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा पेगाससशी काही संबंध आहे का? असा सवाल केला जात असून त्याच्या सखोल चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. (mahavikas aghadi ask report about mantralaya’s 5 officers went israel in 2019)

इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरद्वारे देशात हेरगिरी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीही या पेगागसद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोनही टॅप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार बनवत असताना सरकार बनविण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्वांचे फोन टॅप केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांचे हे आरोप ताजे असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक नवा खुलास करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

सावंतांचा दावा काय?

फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? याच्या चौकशीची सचिन सावंत यांनी मागणी केली आहे. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले?

डीजीआयपीआरचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एनएसओशी पत्रव्यवहार झाला होता का?

कितींदा कोण अधिकारी इस्रायलला गेले? एनएसओ बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? एनएसओशी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदरही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही मागणी केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. देशात पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

ऑक्टोबरमध्ये विधानसभेसाठी राज्यात मतदान झालं. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने नोव्हेंबरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया सुरू असतानाच माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातील पाच अधिकारी इस्रायलला गेले होते. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दहा दिवसाच्यां दौऱ्यावर हे अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर 20 लाख रुपये खर्च झाला होता. विशेष म्हणजे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन त्यांनी दौऱ्यावर जाणं अपेक्षित होतं. पण हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता दौऱ्यावर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला आहे.

दौरा कशासाठी?

हे अधिकारी शेती विषयाचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण त्यांचा हा दावा सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे फेटाळून लावला आहे. हे अधिकारी सोशल मीडिया आणि सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेले असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. त्यामुळे हा दौरा कशासाठी होता? या दौऱ्यात काय अभ्यास केला? कुणी ट्रेनिंग दिलं? कुठं ट्रेनिंग दिलं? पेगाससशी यांचा काय संबंध आहे का? त्याचा सरकारला काय फायदा झाला? आदी गोष्टींची माहिती सरकारने मागवली आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत आल्याचं सांगण्यात येत आहे. (mahavikas aghadi ask report about mantralaya’s 5 officers went israel in 2019)

संबंधित बातम्या:

300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार, वाचा सविस्तर काय घडतंय?

Parliament Monsoon Session: तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

Parliament Monsoon Session: फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, शिवसेना करणार लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी

(mahavikas aghadi ask report about mantralaya’s 5 officers went israel in 2019)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.