AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या,” प्रविण दरेकरांची मागणी

"कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी," अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, प्रविण दरेकरांची मागणी
pravin-darekar
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 7:10 PM
Share

मुंबई : “कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी,” अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी नुकतेच केले आहे. त्यानंतर आता दरेकर यांनी वरिल मागणी केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Citizens who taken both doses of corona vaccine should be allowed to travel by train demanded Praveen Darekar)

रेल्वेप्रवासाची परवानगी देऊन सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा 

“कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच काळापासून रेल्वेप्रवास करु दिला जात नाहीये. त्यांना प्रवासादरम्यान बराच वेळ प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच प्रवासादरम्यानचा हा खर्चही न परवडणारा आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याना रेल्वेप्रवासाची परवानगी दिली पाहिजे. कोविडच्या संकटकाळात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यायला हवा,” असे दरेकर म्हणाले.

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत द्या

याआधी दरेकर यांनी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर कोरोनामुळे ओढावलेल्या बिकट परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं. यामध्ये “कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी,” अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तशी माहिती खुद्द दरेकर यांनी ट्विटरद्वारे दिली.

अजित पवार काय म्हणाले ?

दरम्यान कोरोना लसीकरण आणि सध्याचे लागू असलेले निर्बंध यावर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान महत्वाचे भाष्य केले. त्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. “लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे,” असं पवार म्हणाले.

इतर बातम्या :

Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल

Mumbai Rains Live Update | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये वीजपुरवठा खंडित 

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर

(Citizens who taken both doses of corona vaccine should be allowed to travel by train demanded Praveen Darekar)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.