AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त ठिगळं नको’ , दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

'विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त ठिगळं नको' , दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 21, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तशी माहिती खुद्द दरेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. (Help families of teachers in nongranted schools, Praveen Darekar’s demand to CM Uddhav Thackeray)

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको’

तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या!, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची भेट

17 जुलै रोजी प्रवीण दरेकर हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. ‘कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उपजिविका भागवण्यासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) येथील एका शिक्षकाने शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन दुकानांवर जाऊन चिकटटेप विकणे स्वीकारले तसेच पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील शिक्षकाने गावाकडे जाऊन शेती केली,या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या’, असं दरेकरांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर राज्य सरकार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अवस्थेकडे गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे या प्रश्नावर आवाज उठविणार आहे. अशा शाळांमधील शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे करणार आहे, असं दरेकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या : 

देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर युवासेनेची मोहिम, खुद्द वरुण सरदेसाई नागपुरात

महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड : प्रविण दरेकर

Help families of teachers in nongranted schools, Praveen Darekar’s demand to CM Uddhav Thackeray

Follow Us
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!