AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे शाळा बंद पडली, आर्थिक संकट ओढावल्याने शिक्षक गांजा तस्करीच्या व्यवसायात

पोलीस उपायुक्त डॉक्टर अंकुश शिंदे यांना नागपूर मार्गे गांजाची खेप जाणार असल्याची माहिती मिळाली. वारंगल ते दिल्ली असा मार्ग असल्याने बेलतरोडी पोलिसांनी सतर्क करण्यात आले. | Ganja seized

कोरोनामुळे शाळा बंद पडली, आर्थिक संकट ओढावल्याने शिक्षक गांजा तस्करीच्या व्यवसायात
नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी या शिक्षकाला गांजा तस्करी करत असताना नागपुरात अटक केली. त्याच्याकडून थोडाथोडका नव्हे 92 किलो गांजा जप्त करण्यात आला.
| Updated on: Mar 16, 2021 | 8:38 AM
Share

नागपूर: कोरोना संकटामुळे शाळा बंद पडल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या तेलंगणामधील एक शिक्षक गांजाची तस्करी करत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या शिक्षकाला नागपूर पोलिसांनी नुकतीच अटक झाली. त्यानंतर गांजाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. (school shut down due to coronavirus teacher start ganja smuggling)

नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी या शिक्षकाला गांजा तस्करी करत असताना नागपुरात अटक केली. त्याच्याकडून थोडाथोडका नव्हे 92 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत जवळपास 13 लाख रुपये इतकी आहे.

शाळा बंद पडल्यामुळे गांजाची तस्करी करण्याची वेळ

शिवशंकर इस्मपल्ली हा तेलंगणाच्या वारांगना येथे एका शाळेत शिक्षक म्हणून काम करायचा. मात्र, कोरोना संकटामुळे शाळाच बंद पडली. त्यामुळे या शिक्षकावर आर्थिक संकट ओढावले. यामधून मार्ग काढण्यासाठी त्याने गांजा तस्करीचा पर्याय निवडला. आरोपी शिक्षक वारंगल ते दिल्ली अशा रॅकेटमध्ये सामील झाला. रस्तेमार्गे खेप पोचवत असताना तो नागपूरच्या वर्धा मार्गावर बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागला.

पोलीस उपायुक्त डॉक्टर अंकुश शिंदे यांना नागपूर मार्गे गांजाची खेप जाणार असल्याची माहिती मिळाली. वारंगल ते दिल्ली असा मार्ग असल्याने बेलतरोडी पोलिसांनी सतर्क करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या वर्धा मार्गावर सापळा रचण्यात आला. एका गाडीवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. पण गाडी चालकाने थांबवली नाही. अखेर पोलिसांनी पाठलाग करुन काही अंतरावर जाऊन गाडी थांबवण्यात यश मिळवले. त्यानंतर गाडीची झडती घेण्यात आली त्यातून 92 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 13 लाख रुपये आहे तर गाडीची किंमत पाच लाख रुपये असा एकूण 18 लाखाचा मल बेलतरोडी पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

चाकणमध्ये गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

चाकण पोलिसांकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका कारवाईत गुटख्याचा टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल पाच लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी केला जप्त केला.

चाकणमधील नाणेकरवाडी येथे एका पान टपरीवर कारवाई करून पोलिसांनी आठ हजार 850 रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्रेता आरोपी नीरज बन्सल याला ताब्यात घेऊन गुटख्याच्या पुरवठादार याबाबत चौकशी केली असता आरोपी अंकुर गुप्ता यांच्याकडून गुटखा आणल्याचे आरोपी बंसल यांनी सांगितले. त्यानुसार शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथून पोलीसांनी मोकळ्या जागेतून आरोपी गुप्ता यांचा तीन चाकी टेम्पो गुटख्यासह जप्त केला.

संबंधित बातम्या:

केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई

(school shut down due to coronavirus teacher start ganja smuggling)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.