Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल

राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा यांच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची हैराण करुन सोडणारी आकडेवारी समोर आली आहे.

Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल
उद्योगपती राज कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी


मुंबई : अश्लील चित्रपत निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता राज कुंद्रा यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारं लाखो रुपयांचं डिपॉझिट! राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा यांच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची हैराण करुन सोडणारी आकडेवारी समोर आली आहे. (Raj Kundra’s bank details reveal that lakhs of rupees are being deposited every day)

हाती लागलेल्या एक्स्क्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे. ही रोजची आकडे लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा हे किती रुपयांची कमाई करत होते, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

राज कुंद्रा यांचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स

22 डिसेंबर 2020 – 3 लाख रुपये

25 डिसेंबर 2020 – 1 लाख रुपये

26 डिसेंबर 2020 – 10 लाख रुपये

28 डिसेंबर 2020 – 50 हजार रुपये

3 जानेवारी 2021 – 2 लाख 5 हजार रुपये

10 जानेवारी 2021 – 3 लाख रुपये

13 जानेवारी 2021 – 2 लाख रुपये

20 जानेवारी 2021 – 1 लाख रुपये

23 जानेवारी 2021 – 95 हजार रुपये

3 फेब्रुवारी 2021 – 2 लाख 70 हजार रुपये

..तर राज कुंद्रा यांना 3 वर्षाचा तुरुंगवास!

राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत असल्याची माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी दिलीय.

राज कुंद्राचा ‘प्लॅन-बी’

अश्लील चित्रपट प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. हॉटशॉट अ‍ॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने प्लॅन बी बनवला होता. प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अॅप काढून टाकल्यानंतर देखील राज कुंद्रा नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे. राज कुंद्राने सगळा बोल्ड कंटेंट काढून Play Store वर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही या चॅटमध्ये आहे.

संबंधित बातम्या :

राज कुंद्रा प्रकरण ऐकून कंगना रनौत संतापली, म्हणाली ‘म्हणूनच मी संपूर्ण इंडस्ट्रीला गटार…’

Raj Kundra Case Update : सचिन वाझेंमुळे राज कुंद्राची अटक पाच महिन्यांपासून लांबणीवर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Raj Kundra’s bank details reveal that lakhs of rupees are being deposited every day

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI