Sangli | आरफळ कॅनलमध्ये दोन मुली बुडाल्या, एकीचा मृतदेह सापडला, दुसरी बेपत्ता, सांगली जिल्ह्यातील तासगावची घटना

शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यांना आरोही घटनास्थळापासून 1 किमी अंतरावर सापडली.

Sangli | आरफळ कॅनलमध्ये दोन मुली बुडाल्या, एकीचा मृतदेह सापडला, दुसरी बेपत्ता, सांगली जिल्ह्यातील तासगावची घटना
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 3:00 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) तासगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर येथे कपडे धुण्यासाठी कॅनलवर (Arfal Canol) गेलेल्या दोघींचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. यापैकी एकीचा मृतदेह सापडला तर दुसरी अद्याप बेपत्ता आहे. या घटनेत चार वर्षाच्या मुलगी अचानक कॅनलमध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय मुलीलाही पाण्यानं आत ओढलं. या घटनेत चार वर्षीय मुलीचा मृतदेह हाती लागला असून मोठी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.

काय घडली घटना?

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर विसापूर येथील जुन्या बामणी रोडजवळ बेरडकी मळ्यात मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या आरफळ कॅनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना अचानक आरोही कॅनालच्या पाण्यामध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघी पाण्याबरोबर वाहून गेल्या. यापैकी आरोही ही घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर मृतावस्थेत सापडला आहे. तर दुर्गा अद्याप बेपत्ता आहे. आरोही ही आपल्या नातेवाईकांकडे आली होती.

रात्री उशीरपर्यंत शोधकार्य

शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यांना आरोही घटनास्थळापासून 1 किमी अंतरावर सापडली. तिला तात्काळ बाहेर काढले असता पाण्यामध्ये बुडाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. गावातील चाळीस ते पन्नास तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर परिसरातील आरफळ कॅनॉलमध्ये शोध घेतला.मात्र रात्री उशिरापर्यंत दुर्गा सापडली नाही. अद्याप शोधकार्य सुरू आहे.