Jalna | वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात, जालन्यात टेम्पो चालक जागेवरच ठार

जालना जिल्ह्यातील तळणी ते लोणार रोडवर सदर घटना घडली. मंगळवारी रात्री वाळू वाहून नेणाऱी दोन वाहने अशा प्रकारे एकमेकांवर धडकली.

Jalna | वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात, जालन्यात टेम्पो चालक जागेवरच ठार
जालन्यात भीषण अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू, डावीकडे मृत सचिन खंदारेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 10:36 AM

जालनाः जिल्ह्यात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात (Terrible accident) झाला. वाळू वाहून नेणारी दोन वाहने एकमेकांवर जोरात आदळून हा अपघात (Jalna Accident) झाला. या घटनेत वाळूचा टेम्पो पूर्ण उलटला. त्यामुळे टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक पलटी झाल्यामुळे त्यातील वाळू रस्त्यावर पसरली. अपघातानंतर रस्त्यातील लोक मदतीसाठी धावले मात्र चालकाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू (Accidental death) झाला. लोकांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले, मात्र तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.

कुठे झाला अपघात?

जालना जिल्ह्यातील तळणी ते लोणार रोडवर सदर घटना घडली. मंगळवारी रात्री वाळू वाहून नेणाऱी दोन वाहने अशा प्रकारे एकमेकांवर धडकली. लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरहद वडगाव पाटीजवळ हा अपघात झाला. यात कानडी गावातील सचिन खंदारे या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण वाळूच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता.

तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू

जालन्यात अन्य एका घटनेत तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहरातील मोती तलावात मंगळावारी साडे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात माणिक बापूराव निर्वळ (40) आणि आकाश निर्वळ (14) अशी मृत बाप लेकाची नावं आहेत. माणिक हे दुचाकी धुण्यासाठी मंगळवारी आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन गेले होते. तलावाच्या कडेला ते पोहत होते. मोठा मुलगा आकाश याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी वडील त्याच्या जवळ गेले. आकाशने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली, त्यानंतर ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यांची इतर दोन मुले जवळच पोहत होती. पण हा प्रकार पाहून ते बाहेर आले आणि लोकांना मदतीसाठी बोलावू लागले. मात्र पाण्यातील गाळात हे मृतदेह फसल्यामुळे अग्निशमन दलाच्या मदतीनेच त्यांना बाहेर काढावे लागले.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.