Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये सात टन रक्तचंदन जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

सदाशिव झावरे यांच्या मालकीचे एमआयडीसी हद्दीत गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवण्यात आले होते. याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सहायक निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून खात्री केली.

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये सात टन रक्तचंदन जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अहमदनगरमध्ये सात टन रक्तचंदन जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:57 PM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये एमआयडीसी पोलिसांनी एका गोदामात छापा (Raid) टाकत सुमारे सात टन रक्तचंदन (Red Sandalwood) जप्त केलं आहे. जप्त (Seized) करण्यात आलेल्या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 3 कोटी 83 लाख रूपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जप्त केलेलं चंदन हे इतर राज्यातून आलेलं असल्याने या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती समोर येईल असं पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.

बटाट्याच्या गोणीखाली लपवले होते रक्तचंदन

सदाशिव झावरे यांच्या मालकीचे एमआयडीसी हद्दीत गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवण्यात आले होते. याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सहायक निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून खात्री केली. गोदामामध्ये बटाट्याच्या गोण्याखाली रक्तचंदन लपवून ठेवण्यात आले होते. लपवून ठेवण्यात आलेले सुमारे सात टन रक्तचंदन पोलिसांनी हस्तगत केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 3 कोटी 83 लाख रुपये किंमत आहे. या टोळीत आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे आणि हे रक्तचंदन अहमदनगरमध्ये कसे आणले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अकोल्यात आयजी पथकाचा बिझनेस सेंटरमध्ये छापा

अकोला जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अकोला बिझनेस सेंटर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने छापेमारी करून 40 लाखांच्यावर प्रतिबंधीत गुटखा ताब्यात घेतला आहे. जुने पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोला बिझनेस सेंटर येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे या पथकाने अकोला बिझनेस सेंटर येथे छापेमारी केली. यावेळी या ठिकाणी पोलिसांना ट्रक उभा असलेला दिसला. या ट्रकमध्ये वर टायर तर त्याखाली गुटख्याची पोती होती. तब्बल 40 लाख रुपयांच्या वर गुटखा जप्त केला असून सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. (Seven tonnes of red sandalwood seized by MIDC police in Ahmednagar)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.