AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Drowned : बीडमध्ये गोदावरी नदीत बुडून सख्ख्या मावस बहिणींचा मृत्यू, एकीला वाचवायला दुसरी गेली अन् दोघीही बुडाल्या

दिपाली बरबडे ही गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील रहिवासी होती तर स्वाती चव्हाण ही परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होती. त्या दोघी नात्याने सख्या मावस बहिणी होत्या. शाळा, महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असल्याने त्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महातपुरी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या.

Beed Drowned : बीडमध्ये गोदावरी नदीत बुडून सख्ख्या मावस बहिणींचा मृत्यू, एकीला वाचवायला दुसरी गेली अन् दोघीही बुडाल्या
बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 04, 2022 | 5:45 PM
Share

बीड : बीड जिल्ह्यात वाळूमाफियांनी हौदोस माजवला आहे. वाळू माफियांमुळे माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे गोदावरी नदी (Godavari River)च्या पात्रात बुडून दोन मावस बहिणीं (Sisters)चा दुर्दैवी बुडून (Drowned) मृत्यू झाला आहे. दीपाली गंगाधर बरबडे (20) आणि स्वाती अरुण चव्हाण (12) असं या दोघा मुलींची नावं आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या गावी आल्या होत्या. यादरम्यान गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता, त्या पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र या ठिकाणी वाळू माफियांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने यात बुडून त्या दोघींचा मृत्यू झाला. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर वाळुमाफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.

दोघीही उन्हाळी सुट्टीत मावशीकडे आल्या होत्या

दिपाली बरबडे ही गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील रहिवासी होती तर स्वाती चव्हाण ही परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होती. त्या दोघी नात्याने सख्या मावस बहिणी होत्या. शाळा, महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असल्याने त्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महातपुरी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या. या कालावधी दरम्यान शुक्रवारी 3 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दीपाली आणि स्वाती आपल्या मावशीसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या.

लहान बहिणीला वाचवताना दोघीही बुडाल्या

गंगेत अंघोळ करण्याच्या नादात स्वाती चव्हाण ‌अंघोळ करत असताना खोल पाण्यात पडली.‌ ती बुडत असल्याचे पाहून दिपालीने पाण्यात उडी मारली. पण दोघींनाही पोहता येत नव्हते त्यामुळे त्यांनी एकमेकींना मिठ्ठी मारली अन् दोघीही बुडाल्या. यानंतर मावशी व इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर काही पुरुष तेथे धावून आले आणि त्यांनी मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण बराच वेळ लोटल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिंवाचे शवविच्छेदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्या माहितीनुसार माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माणिक राठोड करत आहेत. (Cousin sisters drowned in Godavari river in Beed)

Follow Us
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...