AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली का? OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या

Ladki Bahin Yojana e-KYC Update: लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खरंच पुन्हा सुरू झाली आहे का? कारण राज्यातील काही महिलांच्या मोबाईलवर या विषयीचे मॅसेज आले आहेत. काय आहे अपडेट, OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली का? OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली का?
| Updated on: Nov 19, 2026 | 12:34 PM
Share

Ladki Bahin Yojana e-KYC Update: 2024 मधील विधानसभा निडवणुकीदरम्यान आणि नंतर माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. पण ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक महिला या योजनेतून बाद झाल्या. योजनेत ई-केवायसी पूर्ण झालेल्या 1.65 कोटी महिलांना मदत मिळत आहे. तर 92 लाख महिला कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही अथवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा सर्व पात्र महिलांच्या बँका खात्यात पैसे जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी असे आश्वासन दिले होते. तर गेल्या तीन दिवसांपासून काही महिलांच्या मोबाईलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी मॅसेज येत आहे. काय आहे अपडेट, OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन?

जवळपास 81 लाख महिलांची तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. केवायसी अभावी आर्थिक लाभापासून वंचित 81 लाख लाडक्या बहि‍णींना पुन्हा योजनेत समावून घेण्यात येणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहि‍णींची केवायसी प्रक्रिया झालेली नाही. अथवा ज्यांची केवायसी प्रक्रिया होऊनही त्यांना सन्माननिधी मिळत नसेल. त्यांना तो लगेच मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी ही हमी दिली होती.

मॅसेजाला बळी पडू नका

दरम्यान राज्यातील काही महिलांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भात मॅसेज आल्याचे समोर आले आहे. पण लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in वर याविषयीची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर येत आहे. यामुळे अशा मॅसेजमधील लिंक न उघडण्याचे आणि आधार कार्डशी संबंधित ओटीपी शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांसाठी अजून एक मोठी योजना

राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या धरतीवर महिलांसाठी अजून एक मोठी योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील एकल महिलांसाठी सरकार मोठे पाऊल टाकत आहे. एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्यात येत आहे. या महिला खमकेपणे एकटाच कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. पतीचे निधन, घटस्फोटीत, परितक्त्या महिलांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

Follow Us
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!