AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st Test : सिराजसारख्या दमदार, टॉप बॉलरला पहिल्या कसोटीतून ड्रॉप का केलं? शुबमन गिलने दिलं उत्तर

IND vs NZ 1st Test : इंडिया ए आणि न्यूझीलंड ए मध्ये तीन अनअधिकृत कसोटी सामने झाले. त्यात ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी दमदार प्रदर्शन केलं. त्यांना न्यूझीलंडमधील वातावरण आणि पीचचा एक चांगला अनुभव आहे.

IND vs NZ 1st Test : सिराजसारख्या दमदार, टॉप बॉलरला पहिल्या कसोटीतून ड्रॉप का केलं? शुबमन गिलने दिलं उत्तर
Mohammed SirajImage Credit source: PTI
| Updated on: Nov 19, 2026 | 12:20 PM
Share

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे भारत-न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. भारताने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे. फक्त मालिका विजय मिळवणं एवढचं भारताचं लक्ष्य नसेल तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न असेल. दोन्ही संघांनी टीममध्ये चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. भारताने संघ निवडताना दोन धक्कादायक निर्णय घेतले. रवींद्र जाडेजाऐवजी वॉशिंग्टन सुंदरची टीममध्ये निवड केली आणि मोहम्मद सिराजला ड्रॉप करुन त्याच्याजागी आकाश दीप आणि अंशुल कंबोजची निवड केली. भारताने न्यूझीलंड मध्ये शेवटचा कसोटी विजय 18 वर्षांपूर्वी मिळवला होता. त्यावेळी हॅमिल्टनमध्ये भारताने न्यूझीलंड वर 10 विकेटने विजय मिळवला होता. मागच्या 50 वर्षातील भारताने न्यूझीलंडमध्ये मिळवलेला तो एकमेव विजय आहे.

कसोटी मालिकेआधी भारत-न्यूझीलंड मध्ये टी20 आणि वनडे सीरीज झाली. भारताने टी20 सीरीज 3-2 ने तर वनडे मालिका 3-1 ने जिंकली. आता कसोटी मालिका जिंकण्याचं अवघड आव्हान टीम इंडियासमोर आहे. टेस्ट सीरीजआधी भारताने कुलदीप यादवला देशांतर्गत क्रिकेट मालिकेसाठी रिलीज केलं. त्याच्याजागी गुरनूर बराडचा टीममध्ये समावेश केला.न्यूझीलंडला सुद्धा टेस्ट सीरीज आधी काही झटके बसले. मिचेल सँटनरला दुखापत झाल्याने तो सुद्धा या मालिकेतून आऊट झालाय.

साई सुदर्शन वगळता प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांचा समावेश

“आम्ही पाच-सहा सत्रात चांगला सराव केलाय. सामन्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही चार वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. आकाशदीप, अंशुल कंबोज, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदरचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केलाय” असं शुबमन गिलने सांगितलं.

खूप कठीण निर्णय होता

टॉस जिंकल्यानंतर शुबमन गिलने मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रारर यांना प्लेइंग इलेव्हन बाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. “सिरार आणि ब्राररला बाहेर ठेवण्याचा निर्णय दुर्देवी आहे. पण जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान चौकडीवर विश्वास व्यक्त केला. ते वेलिंग्टनध्ये चांगला खेळ दाखवतील” अशी अपेक्षा गिलने व्यक्त केली. “कुठला संघ निवडायचा हा निर्णय खूप कठीण होता. मागच्या आठवड्याभरापासून कुठल्या कॉम्बिनेशनची निवड करायची यावर आम्ही विचार करत होतो. खूप कठीण निर्णय होता. कारण सर्वच फास्ट बॉलर चांगलं प्रदर्शन करतायत. सिराज आणि गुरनूर बाहेर बसवण्याचा निर्णय खूप कठीण होता. वनडे सीरीजमध्ये दोघांनी चांगलं प्रदर्शन केलय. आमच्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता” असं शुबमन गिल म्हणाला.

Follow Us
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार