
अकोला : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या अकोला जिल्हा न्यायालय परिसरासमोरील कार उभी होती. त्या कारने अचानक पेट घेतला.

उभी असलेली कार जळाल्याने कारचे नुकसान झाले. पण, कारमध्ये कुणी नसल्यानं जीवितहानी झाली नाही.

न्यायालय परिसरात असलेली कार इतकी जळाली की, कारची राखरांगोळी झाली. त्यामुळं ही कार आता उपयोगात येणार नाही.

कारच्या आगीची माहिती मिळाताच अकोला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

आग लागल्याचे नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. परंतु, सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.