चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील वाघ अखेर जेरबंद, वनविभागाने का घेतला हा निर्णय?

| Updated on: Feb 22, 2022 | 12:16 PM

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघ जेरबंद करण्याच्या वनविभाग मोहिमेला (Forest Department Campaign) पहिले यश आलंय. चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे दृष्टीस पडलेला वाघ जेरबंद केला.

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील वाघ अखेर जेरबंद, वनविभागाने का घेतला हा निर्णय?
चंद्रपुरात जेरबंद करण्यात आलेला वाघ.
Follow us on

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात अखेर वाघ जेरबंद करण्यात आलाय. चार दिवसांपूर्वी वाग आणि बिबट्याने दोघांचा बळी घेतला होता. दुर्गापूर येथे वीज केंद्राची वसाहत (Power Station Colony at Durgapur) आहे. न्यू एफ गाळा परिसरातील पर्यावरण चौकात सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वाघाला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. वीज केंद्र विशेष पथक (Power Station Special Squad) आणि वनविभागाच्या संयुक्त मोहिमेला (Forest Department Campaign) हे यश आले आहे. याच मुद्यावर परिसरात उपोषण- आंदोलन सुरू आहे. वीज केंद्र परिसरात कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. एकूण 3 वाघांना जेरबंद करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

यांनी केली महत्त्वाची कामगिरी

हा वाघ आईपासून दूर झाला असावा, असे वाईल्ड लाईफचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी सांगितलं. वाघाला जेरबंद करण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यासह अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट यांनी महत्त्वाची कामगिरी केली. वाघाला ट्रान्झीट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या वाघाला जेरबंद केल्यामुळं नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तरीही बिबट्याची दहशत कायम आहे.

तीनपैकी एकाला केले जेरबंद

सोळा फेब्रुवारीला रात्री पावणेअकरा वाजता वाघाने कामगाराला उचलून नेले होते. वीज केंद्रात काम पूर्ण करून सायकलने ते घरी येत होते. भोजराज मेश्राम या कामगाराच्या मृत्यूमुळं त्यांचं कुटुंब रस्त्यावर आले. भोजराज यांना वाघाने उचलून नेल्यानंतर त्यांचे शीर धडावेगळे केले होते. सायकल घटनास्थळीच पडून होती. याची वीज केंद्राच्या व्यवस्थापनाला आणि वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने शोधमोहीम राबविल्यानंतर भोजराज यांचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला. त्यानंतर वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले. तीन वाघांपैकी एका वाघाला जेरबंद करण्यात आले.

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर, कसा येणार आणि जाणार मिनी मंत्रालयाचा पैसा?

बुलडाण्यात सुसाट स्कूल बसची कामगाराला धडक, बसच्या मागच्या चाकाखाली येऊन डोकचं फुटलं