AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून उपोषणाची हाक, मागण्या काय?

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून, यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. जिमखाना स्वायत्तता आणि हॉस्टेलच्या समस्यांबाबत प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून उपोषणाची हाक, मागण्या काय?
mumbai dr Protest
| Updated on: Feb 16, 2026 | 12:18 PM
Share

मुंबईतील ऐतिहासिक आणि आशियातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जे. जे समूह रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून आमरण उपोषणाची सुरु केले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आजपासून तब्बल २०० निवासी डॉक्टरांनी सामूहिक आणि अनिश्चित काळासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

पहिल्या दिवसापासूनच रुग्णसेवेवर परिणाम

निवासी डॉक्टर हे कोणत्याही सरकारी रुग्णालयाचा कणा असतात. जे. जे. सारख्या मोठ्या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग (OPD), वॉर्डमधील देखरेख आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया यामध्ये निवासी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. आज पहिल्याच दिवशी २०० डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. या उपोषणामुळे अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

आम्हाला रुग्णांना त्रास द्यायचा नाही, पण आमच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि स्वायत्ततेसाठी हे पाऊल उचलणे भाग पडले आहे. जोपर्यंत प्रशासन लेखी आश्वासन आणि ठोस कृती करत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील,” असा पावित्रा डॉक्टर असोसिएशनचे सरचिटणीस ऋषिकेश शिंदे यांनी घेतला आहे.

डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या काय?

निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनामागे केवळ आर्थिक मागण्या नसून प्रशासकीय कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. यावेळी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्याही समोर आल्या आहेत.

१. जिमखान्याची स्वायत्तता: ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानाच्या दैनंदिन कामकाजात रुग्णालय प्रशासनाकडून सतत हस्तक्षेप केला जातो, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. निवडून आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या अधिकारांना प्रशासनाकडून बगल दिली जात आहे.

२. मूलभूत सुविधांचा अभाव: डॉक्टरांच्या वसतिगृहातील (Hostels) दुरावस्था आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांसाठीही डॉक्टरांना संघर्ष करावा लागत आहे.

३. सुरक्षेचा प्रश्न: रुग्णालयातील अपुरी सुरक्षा व्यवस्था हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.

४. पगार आणि विद्यावेतन: थकीत पगार आणि विद्यावेतन वेळेवर मिळावे, ही डॉक्टरांची जुनी मागणी अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान या आंदोलनाबाबत जे. जे. रुग्णालय प्रशासनाने अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र, रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून वरिष्ठ डॉक्टरांना कामावर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता वैद्यकीय शिक्षण विभाग यावर काय तोडगा काढतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?