धुळ्यात आगारातून निघालेल्या 4 बसेसची अज्ञातांकडून तोडफोड, एक चालक जखमी

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केलेले असताना त्यामध्ये फूट पाडण्याचा कट रचला जातोय, असा आरोप केला जातोय. या पाश्वभूमीवर धुळ्यात आगारातून सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या आहेत. आज (21 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये एक चालक जखमी झालाय.

धुळ्यात आगारातून निघालेल्या 4 बसेसची अज्ञातांकडून तोडफोड, एक चालक जखमी
dhuke bus attack
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:43 PM

धुळे : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केलेले असताना त्यामध्ये फूट पाडण्याचा कट रचला जातोय, असा आरोप केला जातोय. या पाश्वभूमीवर धुळ्यात आगारातून सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या आहेत. आज (21 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये एक चालक जखमी झालाय.

चार बसेसवर हल्ला, एक चालक जखमी

गेल्या चौदा दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून न घेता प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तब्बल 14 दिवसांनंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. आज सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये या बसेस आगाराबाहेर पडल्या होत्या. परंतु या आपल्या मार्गावर जात असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन, भाजपचा पाठिंबा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. राज्यातील बहुतांश आगारात बसेस जागेवर उभ्या असून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही या आंदोलकांची मुख्य मागणी आहे. मुंबईत आझाद मैदानात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत. तर या आंदोलनाला विरोधी पक्ष म्हणजेच भाजपने पाठिंबा दिलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेले आहेत.

सरकार विलीनीकरणावर अभ्यास करणार

दरम्यान, दुसरीकडे राज्य सरकार एसटी महामडंळाच्या विलीनीकरणावर अभ्यास करण्यास तयार असल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 20 नोव्हेंबर रोजी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच काल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारमधील बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

इतर बातम्या :

Farm Laws: शेतकरी संघटना उर्वरित प्रश्नांसाठी पंतप्रधानांना खुलं पत्र लिहिणार, 27 नोव्हेंबरला आंदोलनावर निर्णय

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती

काँग्रेसच्या जनजागरण पदयात्रेला कल्याणमध्ये मानापमानाचं ग्रहण; सेवा दलाने टाकला बहिष्कार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.