AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपतर्फे राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी भाजप आता घरोघरी जाऊन मोठे कँपेन राबवणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिली.

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 4:09 PM
Share

मयुरेश गणपत्ये, मुंबईः  भाजप केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कट कारस्थान करत आहे, असा एक सूर राजकारणात उमटत आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी भाजप आता महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) नवं कँपेन सुरु करणार आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्रीय तपास एजन्सीविरोधात कशा प्रकारे राजकारण करतेय, याची थेट माहिती या कँपेनद्वारे जनतेला दिली जाईल. भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

महाविकास आघाडीची पोलखोल करणार- राम कदम

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात वक्तव्य करत आहेत. यात नवाब मलिक, अजित पवार यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत आहे, असा आरोप महाविकास आघाडी करत आहे. मात्र यावर आता भाजपदेखील पलटवार करणार आहे. एवढंच नव्हे तर भाजप थेट बूथ मीटिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधेल. महाविकास आघाडी केंद्रीय तपास यंत्रणेला कशा प्रकारे बदनाम करत आहे, याची पोलखोल या संवादात केली जाईल, असी माहिती भाजप प्रवक्त्यांनी दिली.

आघाडी सरकार हे वसूली सरकार- राम कदम

भाजपच्या मोहीमेविषयी माहिती देताना राम कदम म्हणाले, आघाडी सरकार हे एक वसुली सरकार आहे. त्यांचे अधिकारी वसुली करतात. त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. कारण सरकारच्या आशीर्वादानेच ही सर्व कामे चालतात. सरकार वसुली करत असेल तर ते योग्य आणि केंद्र सरकार तपास यंत्रणेद्वारे वसूली मंत्री किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करत असेल तर तो अन्याय? वसूली सरकारच्या याच धोरणाची पोलखोल करण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत, अशी माहिती भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिली.

भाजपात आलेल्या इतर नेत्यांचंही म्हणणं ऐका- काँग्रेस प्रवक्ते

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, भाजप घरोघरी जाऊन असा प्रचार करणार असेल तर चांगलंच आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वगळता जे नेते भाजपात आले आहेत, त्यांचं बोलणंही जरा ऐकलं पाहिजे. आता कोणतीही केंद्रिय तपासणी यंत्रणा आपल्या मागे लागणार नाही. आता आपल्याला निवांत झोप लागेल.. असं हे नेते बोलतात. याचा अर्थ भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतो, हे निश्चित आहे. भाजपचे काही नेते तर खुलेआम केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत आहेत. त्यामुळे भाजपची एक नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चांगली बाब नाही. त्यामुळे भाजपकडून थेट जनमानसात जाऊन अशा प्रकारे प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या-

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 48 तासात मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून यलो अलर्ट जारी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.