पालघरमधील ‘या’ 15 धबधबे आणि धरणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जर तुम्ही पालघरमधील धबधबे आणि धरणांवर पिकनिकचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने (6 सप्टेंबर 2019 पर्यंत) पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर जाण्यास मनाईचे आदेश दिले आहेत.

पालघरमधील ‘या’ 15 धबधबे आणि धरणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 5:58 PM

पालघर: जर तुम्ही पालघरमधील धबधबे आणि धरणांवर पिकनिकचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने (6 सप्टेंबर 2019 पर्यंत) पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर जाण्यास मनाईचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या मनाईमुळे पर्यटकांसह सहलीचे प्लॅनिंग करणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणांवर जाण्यास मनाई करण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

मनाई आदेशात कोणकोणते धबधबे, तलाव आणि धरणांचा समावेश

  1. काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता. जव्हार
  2. हिरडपाडा धबधबा, ता. जव्हार
  3. दाभोसा धबधबा, ता. जव्हार
  4. डोम विहीरा खडखड धरण, ता. जव्हार
  5. पळूचा धबधबा, साखरा, ता. विक्रमगड
  6. वाघोबा खिंड धबधबा, ता. पालघर
  7. एैना दाभोण धबधबा, बोईसर
  8. पडघा, बोईसर धबधबा
  9. देवखोप धरण, पालघर
  10. तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता. पालघर
  11. झांझरोळी धरण, केळवा रोड पूर्व, ता. पालघर
  12. चिंचोटी धबधबा, वसई
  13. तुंगारेश्वर धबधबा, वसई
  14. वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता. पालघर
  15. तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता. वाडा

जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (C) चा उपयोग केला आहे. यानुसार पालघर जिल्ह्यातील 15 धबधबे, तलाव किंवा धरणांभोवती 1 किलोमीटर परिसरात जाण्यास बंदी आहे. ही बंदी 10 जुलै 2019 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत लागू असेल. जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

धबधबे आणि धरणांवर काय करण्यास मनाई?

  1. धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं.
  2. पावसामुळं वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं आणि त्यामध्ये पोहणं
  3. पावसामुळं धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणं अशा ठिकाणी सेल्फी काढणं किंवा कोणत्याही स्वरुपाचं चित्रीकरण करणं
  4. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणं किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणं, मद्य बाळगणं, मद्यवाहतूक करणं, अनधिकृत मद्य विक्री करणं आणि उघड्यावर मद्यसेवन करणं
  5. वाहतुकीचे रस्ते आणि धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवणे
  6. वाहनं अतिवेगानं चालवणं तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहनं चालवणं
  7. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणं
  8. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल आणि प्लास्टिकचं साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणं
  9. सार्वजनिक ठिकाणी आलेल्या महिलांशी छेडछाड करणं, टिंगलटवाळी करणं, महिलांशी असभ्य वर्तन करणं, असभ्य आणि अश्लील हावभाव करणं, शेरेबाजी करणं किंवा लज्जा निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करणं
  10. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणं, डीजे सिस्टम वाजवणं, गाडीमधील स्पीकर, उफर वाजवणं आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणं
  11. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणं
  12. धबधब्याच्या 1 किमी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी आणि सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई (अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळून)

आदेश न पाळल्यास काय शिक्षा

मनाईच्या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (ब) नुसार कारवाई करण्यात येईल. मनाई आदेशात नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्ती, संस्था यांच्याकडून चित्रिकरण, सामाजिक उपक्रम/कार्यक्रम इत्यादींसाठी संबंधित विभागाकडून पूर्व परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना लागू असणार नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.