AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक रमेश म्हात्रे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण, बिलावरून मोठा वाद अन्..

पालघरमध्ये मोठा राडा झालाय. शिंदे गटाच्या नेत्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक रमेश म्हात्रे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण, बिलावरून मोठा वाद अन्..
palghar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 9:48 AM
Share

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवकाने हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेच्या काही दिवसांनंतर आता पालघरमध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. पालघरमध्येही शिंदे गटाच्या नेत्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालघरमधील हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. बिलाच्या रकमेवरून पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याचे माहिती समोर येत आहे. या घटनेने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील रिलीफ हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अतुल घरत यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे शिवसेनेची दहीहंडी फोडताना जखमी गोविंदांवर उपचार केल्यानंतर बिलाच्या रकमेवरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्याचसोबत दमदाटी केल्याचेही सांगण्यात येत आहे.

मारहाणीच्या घटनेत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचाही आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख अतुल घरत, आमदार राजेंद्र गावीत यांचे सुपुत्र रोहित गावीत मिळून सहा जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...