AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का बसला आहे. सरकारने मंत्री भुसे यांच्या अधिकारात मोठी कपात केली आहे. भुसे यांच्या अधिकारत कपात केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात
eknath shinde dada bhuseImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 9:26 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्‍याला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मंत्र्‍याच्या अधिकारात मोठी कपात केली आहे. या निर्णयानुसार आता शिक्षण खात्याचे महत्त्वाचे निर्णय आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना आमदार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अधिकारांना कात्री लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या अधिकारांना कात्री लावण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातील महत्त्वाचे अधिकार कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील अतिरिक्त तुकड्या, शिक्षकांची मान्यता तसेच विविध मंडळांच्या आयसीएससी, सीबीएससी शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे शाळा चालकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे.

कारण काय?

सरकारने निर्णय घेतल्यानंतर बदलामागे अनेक कारणे दिली. विकसित महाराष्ट्र 2047, 100 टक्के ई-गव्हर्नन्स आणि प्रशासकीय कामकाजात गती निर्माण करण्यासाठी निर्णय घेतल्याचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे ज्या खात्याची जबाबदारी भुसे यांच्याकडे आहे. त्याच खात्यातील शाळा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकार हे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले. या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयावर अद्याप शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या निर्णयावर मंत्री भुसे काय बोलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच विरोधक या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.  तत्पूर्वी, राज्यात 10 वर्षाआधी सुमारे बाराशे शाळा होत्या. आता त्याची संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. प्रत्येकवेळी ना-हरकत देताना वरिष्ठ मंडळीचे हात ओले करावे लागतात. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधींचा व्यवहार होत असल्याचा आरोप एका खासगी शाळेच्या संस्थाचालकांनी केलाय.

Follow Us
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी