Mumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू, राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार? मोठी अपडेट

मुंबईतील शाळा या 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.

Mumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू, राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार? मोठी अपडेट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 7:34 PM

मुंबई : राज्यातल्या शाळांबाबत (Mumbai Schools) आधीच मोठा निर्णय वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जााहीर केलाय. त्यानंतर मुंबईतील शाळा कधी सुरू होणार? याबाबत मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली आहे. मुंबईतील शाळा या 27 जानेवारीपासून सुरू (School Starting Date) होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळांबाबत आधीचेच नियम गृहीत धरले जाणार, असल्याची माहितीही काकाणी यानी दिली आहे. अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसला तरी आम्ही शाळा सुरू करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे, ज्यांना शाळेत यायचे आहे ते शाळेत येऊ शकतात, ज्यांना यायचं नाही, ते ऑनलाईन सहभाग नोदवू शकतात, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यात 24 जानेवारीपासून शाळा सुरू

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. असेही त्या म्हणाल्या.

School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

College Reopen : शाळांचं ठरलं..! महाविद्यालयांचा देखील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे, उदय सामंत यांनी काय सांगितलं?

NEET UG PG Counselling 2021 : वैद्यकीय प्रवेशातील 27 टक्के ओबीसी आरक्षणावर सुप्रीम मोहोर; केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं योग्य

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.