School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
वर्षा गायकवाड

Maharashtra School Reopen News : सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. 

गिरीश गायकवाड

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 20, 2022 | 3:32 PM

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु (School Reopen) करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं होतं. कालचं त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.

निवासी शाळांच्या बाबत नंतर निर्णय

निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळं निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याच्या फाईल वर सही केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देणार

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथं पाळली जाईल तिथेच शाळा सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

Video | राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

कोविड लसीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

Maharashtra School Reopen Education Minister Varsha Gaikwad said school will start from 24 January with covid Protocols

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें