AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द

मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द

| Updated on: Sep 05, 2026 | 7:54 AM
Share

मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी महापालिकेच्या सभागृहात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी महापालिकेच्या सभागृहात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राबाबत 20 ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र छाननी समितीने निर्णय देत ते अवैध ठरवलं होतं. त्यानंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी याबाबतची माहिती राज्य सरकारला दिली होती आणि राजपत्र काढण्याची विनंती केली होती. या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे विशाखा राऊत यांना विद्यमान नगरसेवकपदावर राहता येणार नसून, पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरण्याची माहिती समोर आली आहे.

विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या. हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यांनी पालघर जिल्ह्यातील ओबीसी जात प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, याच प्रमाणपत्राची पालघर जात छाननी समितीकडून तपासणी करण्यात आली आणि ते अवैध ठरवण्यात आलं. विशाखा राऊत यांनी 14 डिसेंबर 2025 रोजी हे जात प्रमाणपत्र काढल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, विशाखा राऊत यांनी अवघ्या 167 मतांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव यांचा पराभव केला होता. आता विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दादर पश्चिम आणि शिवाजी पार्क परिसरातील वॉर्ड क्रमांक 191 हा उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रभागात शिंदे गटाचा नगरसेवक येण्याची शक्यता निर्माण झाल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान, सदा सरवणकर यांच्या दोन्ही मुलांचा 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता, त्यामुळे आता त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांना संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Published on: Sep 05, 2026 07:51 AM

Follow Us