AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मुंबई, ठाण्यात गोविंदा निघाले, मटकीतील लाखो रुपयांच्या लोण्यासाठी चुरस

| Updated on: Sep 05, 2026 | 9:22 AM
Share

Maharashtra News LIVE : गिरगावच्या इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीचा मोठा उत्साह दिसून आला. भजनाच्या गजरात भाविक दंग झाले होते. गोकुळाष्टमीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात अखंड हरिनामाचा गजर आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Maharashtra News LIVE : मुंबई, ठाण्यात गोविंदा निघाले, मटकीतील लाखो रुपयांच्या लोण्यासाठी चुरस
Dahi Handi 2026

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Sep 2026 09:19 AM (IST)

    पंढरपूरमध्ये कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा

    गोकुळष्टमी निमित्त पंढरपूरमध्ये रात्री बारा वाजता श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाच्या रूपात सजवून गुलाल, फुलांची उधळण करण्यात आली, तर आर्य वैश्य कोमटि समाजाच्या श्री कृष्ण मंदिरात देखील कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • 05 Sep 2026 09:17 AM (IST)

    घाटकोपरमधील मनसेच्या दहीहंडी उत्सवाला पोलिसांनी दिला झटका

    घाटकोपरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवाला मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला. आज दहीहंडी साजरी होणार त्याच्या बरोबर एकदिवस आधी म्हणजे काल परवानगी नाकारण्यात आली.

  • 05 Sep 2026 09:15 AM (IST)

    शिक्षकांना सलामी देणारी दहीहंडी

    घाटकोपरमध्ये सन्मान दहीहंडीचा उत्साह. शिक्षकांना सलामी देणारी दहीहंडी. शिक्षक दीन असल्याने शिक्षकांना सन्मान. तर मुंबई उपनगरातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध. किरण लांडगे मित्र मंडळ आयोजित सन्मान दहीहंडी. ११,११,३१६ पारितोषिक असलेली सन्मान दहीहंडी.

  • 05 Sep 2026 09:14 AM (IST)

    या दहीहंडी उत्सवाला फडणवीस-शिंदे भेट देणार

    आज दहीहंडी उत्सव बाळ गोपाळांचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस यासाठी ठाण्यातील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. आयोजक उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असून. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनेक सिने अभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात आज दहीहंडी उत्सवाची धूम आहे. मुंबईसह ठाण्यात लाखो रुपये इनाम असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. दरम्यान घाटकोपरमध्ये मात्र थोडा तणाव निर्माण झाला आहे. कारण ऐनवेळी पोलिसांनी मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली. दहीहंडीच्या स्टेजमुळे आपतकालीन मार्ग बंद होईल म्हणून पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. पण आयोजक मात्र दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहेत. दरम्यान दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटील आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मध्यरात्री 2 वाजता देखील जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी मराठा बांधवांची गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी पोहोचले. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवस रात्र मराठा बांधव येत आहेत.

Published On - Sep 05,2026 9:11 AM

Follow Us
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन