ताईचा यात काहीही संबंध नाही, ताई याच्या ढुंXXवर लाथ मारून हाकलतील; पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मामाची पहिली प्रतिक्रिया
Pankaja Munde PA Wife Death : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गाैरी हिने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. हेच नाही तर मागील काही दिवसांपासून गाैरी हिचा छळ सुरू होता. तिला मारहाण केली जात असल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारी महिन्यात पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे आणि गाैरी यांचे लग्न झाले. तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आमचे पोरगी आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा गाैरीच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. अनंत गर्जे हा स्वत: गाैरीला घेऊन रूग्णालयात दाखल झाला होता. हेच नाही तर त्याने अगोदर गाैरीच्या आत्महत्येनंतर पहिला फोन तिच्या वडिलांना केला मात्र, काही बोलणे होण्याच्या अगोदर तो फोन बंद झाला. त्यानंतर त्याने गाैरीच्या आईला फोन केला आहे तुमच्या मुलीने आत्महत्या केली असून ती माझ्या पुढे असल्याचे त्याने सांगितले.
अनंत गर्जे याचे अनैतिक संबंध असल्याने गाैरी आणि त्याच्यामध्ये सतत वाद होत होता. हेच नाही तर गाैरीने त्याला माफीही केले होते. मात्र, तो पुन्हा चॅटिंग करत असल्याचे गाैरीच्या लक्षात आले आणि ती त्रासात होती. आता नुकताच गाैरीच्या मामाने मोठा दावा केला आहे. गाैरी पालवे मुंडे यांच्या मामाने म्हटले की, सर्वात महत्वाचे म्हणजे पंकजा मुंडे यांना हा माणूस कसा होता हे माहिती नव्हते. हा माणूस किती जास्त नालायकपणा करतोय हे त्यांना माहिती नव्हते.
पंकजा मुंडे यांचा यात काहीच विषय नाही. पंकजा मुंडेंचा पीए म्हणजेच हा अनंत गर्जेने गाैरीच्या वडिलांना अगोदर फोन केला आणि त्यानंतर तिच्या आईला आणि सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. दोन ते तीन महिन्यांपासून गाैरीचे आणि त्याचे वाद सुरू होते. पंकजा मुंडे यांचा यात काहीच दोष नाही, त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही. पंकजा मुंडे याला ढुंXXवर लाथ मारून हाकलून देतील.
असे नालायक लोक पंकजा मुंडे सांभाळत नाहीत. अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात भूमिका घ्यावी, असे म्हटले आहे. गाैरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दाैरे रद्द केली आहेत. पंकजा मुंडे यांनी यावर अजून भाष्य केले नसून अनंत गर्जे फरार असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
