AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पार्थ पवारांचे ‘सूचक’ ट्वीट

नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑ़डीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.

नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पार्थ पवारांचे 'सूचक' ट्वीट
पार्थ पवार
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 5:25 PM
Share

पिंपरी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे.  त्यात  11 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  त्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी ही घटना गंभीर असल्याचे सांगत, नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑ़डीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील 110 रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. कोरोना रुग्णालयात देशात आग लागून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर ऑडीटच नाही, तर स्ट्रक्चरल ऑडीटही झाले असल्याची खात्री सबंधितांना करावी, असे सूचक ट्विट त्यांनी 3 तारखेला केले. त्यानंतर चार दिवसांतच नगर जिल्हा रुग्णालयात आग लागली. त्यावर या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ट्विट त्यांनी आज केले.

शहरात अपूर्ण राहिलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना गैरसोईंना सामोरे जावे लागते आहे. सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित शहराचा कारभार बिघडवून सुरु केलेली कामे अपूर्ण ठेवली आहेत,असा हल्लाबोल करत त्यांनी, हीच का स्मार्टसिटी, अशी खोचक विचारणाही त्यांनी केली होती. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांविषयी ते सजग असल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी सत्ताधाऱ्यांचे लक्ष ते वरचेवर वेधीत आहेत. वेळप्रसंगी त्यांची खरडपट्टीही काढत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवर व पक्षाच्या चाललेल्या तयारी व हालचालीवरही त्यांचे लक्ष आहे. या तयारीसाठी शरद पवारानंतर अजित पवार शहरात येणार आहेत. त्यानंतर पार्थ येतील,असे राष्ट्रवादीतूनच सांगण्यात आले.

हे ही वाचा :

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?

कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना 7 दिवसांची सीआयडी कोठडी

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...