AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली

राफेल विमान भ्रष्टाचार (Rafale deal scam) प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली आहे. लढाऊ विमानांच्या सौद्यात लाच घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, भाजपने सांगितले की हे प्रकरण 2007 ते 2012 दरम्यानचे आहे, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते.

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 4:32 PM
Share

नवी दिल्लीः राफेल विमान भ्रष्टाचार (Rafale deal scam) प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली आहे. लढाऊ विमानांच्या सौद्यात लाच घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, भाजपने सांगितले की हे प्रकरण 2007 ते 2012 दरम्यानचे आहे, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुशेन गुप्ता (Suresh Gupta) नावाचा मध्यस्थ, ज्याचे नाव पुढे आले आहे, तो नवीन खेळाडू नाही. व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर (Augusta Westland Helicopter) घोटाळ्यात कमिशन एजंट म्हणून सुशेन गुप्ता यांचे नावही समोर आले होते, असे ते म्हणाले. (After French magazine Mediapart news BJP Congress blame game begins in Rafale deal scam)

फ्रेंच मॅगझिन ‘मीडियापार्ट’ने (French Magazine Mediapart) आपल्या वृत्तात दावा केला आहे की फ्रेंच विमान निर्माता डसॉल्ट एव्हिएशनने (Dassault Aviation) भारताकडून करार सुरक्षित करण्यासाठी एका मध्यस्थाला गुप्तपणे सुमारे 7.5 दशलक्ष युरो (सुमारे 65 कोटी रुपये) दिले आणि डसॉल्ट कंपनीला लाचेची दिलेली रक्कम सक्षम करण्यासाठी बनावट बिले वापरण्यात आली होती. वृत्तानुसार, हा व्यवहार 2007 ते 2012 दरम्यान मॉरिशसमधील (Mauritias) मध्यस्थ द्वारा झाला.

भाजप म्हणतं ‘उलटा चोर कोतवालको डाटे’

काँग्रेसवर निशाणा साधत संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी भारतात नाहीत,  त्यांनी इटलीतून उत्तर द्यावे. इतकी वर्षे काँग्रेसने संभ्रम पसरवण्याचे काम केले, आज त्यांच्या सरकारच्या काळात हा उद्येग झाल्याचे उघड झाले आहे. भारतीय हवाई दलाला लढाऊ विमानांची गरज होती आणि 10 वर्षे हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. ते तडजोड करत होते, हे अत्यंत खेदजनक आहे.

पात्रा म्हणाले की, “‘उलटा चोर कोतवालको डाटे’ असं झालय. आज INC म्हणजे ‘आय नीड कमिशन’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ते कमिशनशिवाय काहीही करत नाहीत. यूपीएच्या काळात प्रत्येक डीलमध्ये एक डील असायची.”

राहुल गांधी म्हणतात ‘भ्रष्टाचारा विरूद्ध लढा चालू ठेवा’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल डीलमध्ये कमिशन दिल्याची बातमी शेअर करताना ट्विटरवर लिहिले होते की, “जेव्हा प्रत्येक टप्प्यावर सत्य तुमच्यासोबत असते, तेव्हा काळजी करण्याची काय गरज आहे? माझ्या काँग्रेस सहकाऱ्यांनो – भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात असेच लढत राहा. थांबू नका, खचून जाऊ नका, घाबरू नका!”

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने या करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, मात्र सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले होते. राफेल बनवणारी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या करारात भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले होते. 2019 मध्ये, सुप्रीम कोर्टाने या कराराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. त्याला कोणताही आधार नाही हे कारण देण्या आलं

भारतीय तपास यंत्रणांनी मुद्दाम तपास करत नाही ?

मीडियापार्टने आरोप केला की, “अशी कागदपत्रे” असूनही, भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. “यामध्ये ऑफशोर कंपन्या, संशयास्पद करार आणि ‘बनावट’ बिलांचा समावेश आहे,” असा दावा अहवालात करण्यात आला आहे. मीडियापार्ट खुलासा करू शकतो की भारताची तपास संस्था CBI आणि ED च्या अधिकार्‍यांकडे ऑक्टोबर 2018 पासून पुरावे आहेत की फ्रेंच एअरलाइन Dassault ने मध्यस्थ सुशेन गुप्ता यांना गुप्त कमिशनमध्ये किमान 7.5 दशलक्ष युरो दिले होते.”

Other News

‘फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार’, फडणवीसांच्या आरोपानंतर मलिकांचा थेट इशा

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा इशारा नेमका कुणाकडे?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.