AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण, महिला आयोगाचा मोठा निर्णय, आता..

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे, आता या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण, महिला आयोगाचा मोठा निर्णय, आता..
crimeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 12:02 PM
Share

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये गुरुवारी एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. एका हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं, दरम्यान मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहतावर एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिने निलंबीत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केला तर प्रशांत बनकर याच्याकडून आपला मानसिक आणि शारीरीक छळ सुरू होता असा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे.

दरम्यान या प्रकरणावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रकरण समोर येताच गोपाळ बदने याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता, अखेर तो पोलिसांना शरण आला आहे, तर या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केलं होतं. गोपाळ बदने याला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आता या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उद्या फलटणला जाणार आहेत.  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील तपासी अधिकारी तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख यांच्यासोबत उद्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची बैठक होणार आहे. या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा  उद्या रूपाली चाकणकर घेणार आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? 

सातारा जिल्ह्यातील फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे, या प्रकरणात तिने पीएसआय गोपळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिसांवर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोनही आरोपींना अटक करण्यात आलं असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?