
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सध्या पंचनामे सुरू आहेत. प्रशासनाकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली. हेच नाही तर लोकांची राहण्याची आणि खाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीये. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्क राहण्यासोबतच लोकांना मदत तात्काळ पोहोचवा अशा सूचना दिल्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत रस्त्यावर उतरले. सोलापुरमध्ये शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले झापले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी थेट म्हटले की, तुमच्या पक्षाकडूनही मदत करा ना…3 हजार लोक असताना तुम्ही फक्त 200 किट घेऊन आले. नुसते 200 किट नको तर 3 हजार लोकांची व्यवस्था करा. हेच नाही तर आम्ही लोकांना बाहेर काढले, तुम्ही नाही, असेही त्यांनी यादरम्यान ज्योती वाघमारे यांनी म्हटले. राजकारणाची वेळ नाही मदत वाढवा. तुमची मदत वाढवा, असे जिल्हाधिकारी ज्योती वाघमारे यांना ठणकावून म्हणताना दिसले.
जेवणाच्या किटवरून ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता. यावेळी त्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना चांगल झापलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि ज्योती वाघमारे यांच्यातील संवादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्योती वाघमारे या मदत घेऊन पोहोचल्या होत्या.
लोकांना जेवणाच्या किट मिळाल्या नसल्याने त्या चागंल्याच संतापल्या आणि त्यांनी थेट फोन स्पीकरवर ठेऊन लोकांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी फोन लावलेल्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनीच चांगले झापले आणि आम्ही लोकांना मदत पुरवत आहोत. पुन्हा पूर येण्याची स्थिती असल्याने प्रशासन काम करत आहे. 3 हजार लोक तिथे असताना तुम्ही फक्त 200 किट घेऊन आल्याचे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच सुनावले आणि ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.
शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोचवणे हा माझा गुन्हा आहे का?? मी काय दोन नंबर धंद्यासाठी, टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला होता का?? लोकांचा आवाज बनणे हा जर गुन्हा असेल तर कुणी फासावर लटकवले तरी मी चालेल मी लढत राहीन, असे शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या संवादानंतर स्पष्टपणे म्हटले आहे.